Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“भीक नाही, मागतोय हक्काची नोकर भरती!” एमपीएससी परीक्षार्थी आणि अन्य तरुणांचा राज्यभर महाआक्रोश!

June 20, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं
0
MPSC Samanvayak Samiti (4)

मुक्तपीठ टीम

राज्यात लवकरच नोकर भरती केली जाईल अशी आश्वासनं राज्य सरकार नेहमी देत असतात, मात्र प्रत्यक्षात सरकार वेळकाढूपणा करत असतो. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षार्थींचा संताप शिगेला पोहचला आहे. “भीक नाही, मागतोय हक्काची नोकर भरती!” या एकाच भावनेतूून महाराष्ट्रातील तरुणाई रस्त्यावर उतरू लागली आहे. एमपीएससी समन्वय समितीसह अन्य संघटनांनी राज्यव्यापी महाआक्रोश मोर्चांची घोषणा केली आहे. या मोर्चांना स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आणि संभाजी ब्रिगेडसह अन्य अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

समन्वय समितीच्या निवेदनातून दिलतोय तरूणाईचा संताप…

नवीन सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात नोकरभरती एकतर पूर्णपणे ठप्प आहे किंवा ज्या नोकर भरती झाल्या त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. अनेक मंत्री फक्त नोकर भरतीच्या घोषणा करताना दिसून येत आहेत. या भ्रामक बातम्या पसरविण्याचे काम राज्यातील मोठी मीडिया हाउसेस करताना दिसून येत आहे, असाही या तरुणांचा आरोप आहे. प्रत्यक्षात कोणतीही मोठी नोकर भरती मागील काही काळापासून सरकारने काढलेली नाही तसेच ज्या हजारो पदांचे अर्ज मागील तीन – चार वर्षांपासून विद्यार्थांनी भरले आहेत त्याही परीक्षा घेण्यास सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे.

वर्ग-३/४ भरतीसाठी २०१७ साली फडणवीस सरकारद्वारे “महापरीक्षा पोर्टल” ही वेबसाईट स्थापन करून खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या, त्यात भ्रष्टाचार झाल्याने नवीन सरकारने महापरीक्षा बंद केले. २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा त्याच प्रकारच्या पाच खासगी कंपन्यांना काम दिले. त्यापैकी NYSA कंपनीद्वारे आरोग्य भरतीत पेपरफुटी, GA सॉफ्टवेअर द्वारे म्हाडा आणि TET परीक्षेत पेपरफुटी आणि भ्रष्टाचार करण्यात आला, तसेच MIDC परीक्षा घेतलेली आपटेक ही कंपनी काळ्या यादीत असूनही काम दिले गेले. हा सर्व भ्रष्टाचार MPSC समन्वय समितीने बाहेर काढला होता व आमच्याच अधिकृत पोलीस तक्रारीनंतर विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल झाले. या सर्व गैरप्रकारांमुळे सरकारने या पाच कंपन्यांचे काम काढून TCS/ IBPS/ MKCL या कंपन्यांना दिले परंतु पुन्हा ४ मे २०२२ रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार कोणत्याही खासगी कंपनीला काम देऊन जिल्हा निवड समिती परीक्षा घेऊ शकतात असा शासन निर्णय काढला. IBPS/TCS या विश्वासू कंपन्यांना डावलून पुन्हा भ्रष्टाचाराला आवतन दिले गेले. आधीच नोकर भरती ठप्प आहे त्यात भ्रष्टाचारामुळे बेरोजगार नैराश्यात आहेत, त्यामुळे आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत आहोत, ठीक-ठिकाणी शांततेत आंदोलने/ मोर्चे काढण्यात येतील. त्यातील पहिला मोर्चा यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात संपन्न झाला. आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात , आपण आमच्या मागण्या लाऊन धराल ही अपेक्षा. आमच्या खालील मागण्या आहेत:

  1.  पेपरफुटी नंतर पोलिसांच्या अहवालानुसार आरोग्य भरतीची गट – क आणि गट – ड परीक्षा रद्द करत फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात यावी, तसा अधिकृत GR प्रसिद्ध करण्यात यावा.
  2. २०१९ पासून अर्ज केलेली जिल्हा परिषद भरती सरसकट १३५१४ पदांसाठी, जिल्हा निवड समितीमार्फत येत्या १५ दिवसांत घ्यावी. याचे काम खासगी कंपन्यांना देण्यात येऊ नये, ग्रामविकास विभागाच्या १० मे २०२२ च्या GR मध्ये तसे शुद्धिपत्रक काढण्यात यावे.
  3. गृहमंत्री मा. दिलीप वळसे यांनी केलेल्या घोषणेनुसार पोलीस भरतीची जाहिरात जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात यावी.
  4. महसूल मंत्री मा . बाळासाहेब थोरात यांनी विधान सभेत केलेल्या घोषणेप्रमाणे तलाठी पदांची जाहिरात याच महिन्यात प्रसिद्ध करण्यात यावी.
  5. २०१८ पासून प्रलंबित शिक्षक भरती पूर्ण करत शिक्षण मंत्र्यानी घोषणा केल्याप्रमाणे यावर्षी नवीन शिक्षक भरतीची TAIT जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
  6. पेपरफुटीवर राजस्थान आणि उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात विशेष कायदा करण्यात यावा.
  7. परीक्षा लवकर घ्यायच्या आहेत म्हणून आता सर्व सरळसेवा परीक्षा जिल्हा निवड समिती मार्फत घेण्यात याव्या परंतु येत्या काही महिन्यात सर्व वर्ग -३ च्या भरती MPSC मार्फत राबविण्यात याव्या असे नियोजन करण्यात यावे.

आपला स्नेहांकित राहुल कवठेकर
(अध्यक्ष: MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य)
संपर्क 8668378583
Twitter:- @mpsc_andolan mpscsamnvaysamiti@gmail.com

 

कधी कुठे महाआक्रोश मोर्चा?

सोमवार २० जून, २०२२

MPSC Samanvayak Samiti (2)

मंगळवार, २१ जून २०२२

MPSC Samanvayak Samiti (1)

गुरुवार, २३ जून २०२२

MPSC Samanvayak Samiti (3)


Tags: MaharashtraMPSCMPSC Samanvay Samiteeएमपीएससी परीक्षार्थीएमपीएससी समन्वय समिती
Previous Post

प्रसिद्धीसाठी घोषणांचा सुकाळ आणि कृतीचा दुष्काळ! पडळकर आणि इतर बरेच काही…

Next Post

राज्यात २३५४ नवे रुग्ण, १४८५ रुग्ण बरे! मुंबई १३१०, नाशिक १७, नागपूर ३ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २३५४ नवे रुग्ण, १४८५ रुग्ण बरे! मुंबई १३१०, नाशिक १७, नागपूर ३ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!