Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

खेलो इंडिया युथ गेम्स : लॉन टेनिसमध्ये सुवर्णाची ‘आकांक्षा’पूर्ती

June 12, 2022
in featured, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Khelo India Youth Lawn Tennis Akanksha Nithure

मुक्तपीठ टीम

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे. एकेका सुवर्णपदकासाठी काट्याची लढाई सुरू आहे. लॉन टेनिसमध्ये सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (६-७, ७-६ व ६-४) हा सामना जिंकला.

पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये कर्नाटकच्या मुयरीने आघाडी घेतली होती. पहिले चार गुण मिळवल्यानंतर तिने सामन्यावर पकड बनवली. परंतु आकांक्षाने ४-४ आणि ५-५, ६-६ अशी बरोबरी साधली. परंतु ऐनवेळी मुयरीने गुण घेत पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही पहिले पाच गुण घेऊन मयुरी पुढे होती. परंतु आकांक्षाने नंतर खेळ प्रकारात बदल करुन फोरहँड, बॅकहॅडचे फटके मारून तिने गुण घेण्यास सुरूवात केली. सहा-सहा गुण बरोबरी झाली. नंतर आकांक्षाने एक गुण घेत दुसरा सेट (७-६) जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली.

नेहमीप्रमाणे तिसऱ्या सेटमध्ये मयुरी आघाडीवर राहिली. पहिले चार गुण घेत तिने आकांक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आकांक्षा दोन गुणांवर होती. तेव्हापासून खेळाचा नूर पालटला. दोघीही एकेका गुणांसाठी झगडत होत्या. त्यांना प्रत्येकी तीन अॅडव्हान्टेज मिळाले. परंतु तिसरा महत्त्वाच पॉईंट ही आकांक्षानेच घेतला. चौथाही गुण सहज घेतला.  चार-चार अशी बरोबरी झाल्याने मयुरी बॅकफूट गेल्याचे दिसून आले. पाचवा गुणही आकांक्षानेच घेतला. दबावात आलेल्या मयुरीवर तिने पुन्हा एक महत्त्वपूर्ण गुण घेत तिसऱ्या सेटमध्ये (६-४) अशा फरकाने सामना जिंकला.

एकेरीत सहज कांस्य

मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियाणाच्या श्रृती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रृती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.

क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आकांक्षाचा उत्साह वाढविला

एकेरीत सुवर्णपदक पटकावणारी आकांक्षा ही नवी मुंबईतील एएसए अकादमीत सराव करते. प्रशिक्षक अरूण भोसले यांच्यासोबत महाराष्ट्राचे क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, ओएसडी व्यंकेश्वर, खो-खोचे प्रशिक्षक उदय पवार यांनी सामन्यास उपस्थित राहून आकांक्षाला प्रोत्साहन दिले. ती पिछाडीवर असतानाही मानसिक बळ देण्याचे काम त्यांनी केले. क्रीडा मंत्री सुनील केदार व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही शुभेच्छा देत खेळाडूंचा उत्साह वाढविला.

सायकलिंगमध्ये रौप्य, टेटेमध्ये मुली फायनलमध्ये

रोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. टेबल टेनिसमध्येही मुलींनी महाराष्ट्राचा हरियानात डंका वाजवला आहे. त्यांचा अंतिम सामना सायंकाळी सहा वाजता हरियाणासोबत होणार आहे. दिया चितळे व स्वस्तिका घोष (दोघीही मंबई) या हरियाणाच्या सुहाना सैनी व चक्रवर्ती यांच्यासोबत लढतील.


Tags: Akanksha Nithurekhelo indiaKhelo India Youth GamesLawn Tennisआकांक्षा निठुरेखेलो इंडियाखेलो इंडिया युथ गेम्सलॉन टेनिस
Previous Post

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची केंद्राच्या ‘कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’ मोहर

Next Post

कोल्हापूरमध्ये बॅंक ऑफ इंडियात करिअर संधी

Next Post
boi

कोल्हापूरमध्ये बॅंक ऑफ इंडियात करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!