मुक्तपीठ टीम
अखेर कोरोनाविरोधात लागू केलेल्या कडक निर्बंधामधून महाराष्ट्र बाहेर येण्याची सुरुवात झाली आहे. राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज अनलॉकची घोषणा केली. महाराष्ट्रात आता पाच टप्प्यांमध्ये व्यवहार पूर्ववत सुरु होणार आहेत. अनलॉक करण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका यांना ४३ भागांमध्ये विभागले आहे. कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णालयातील खाटांची उपलब्धता असे अनेक निकष ठरवून त्याआधारे अनलॉकसाठीचे टप्पे ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत अनलॉक केले जात असतानाच उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहे.
(आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वडेट्टीवारांनीही त्यांच्या विभागाच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. अद्याप निर्णय झालेला नाही. मी तत्वत: हा शब्द वापरण्यास विसरलो, असे स्पष्ट केले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करतील असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.)
महाराष्ट्र अनलॉक होणार तरी कसा?
- लॉकडाऊन शिथील करण्यासाठी पाच पातळ्या ठरवल्या आहेत.
- जेथे पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता २५ टक्क्यांच्या आत असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील.
- आता जमावबंदी राहणार नाही.
- खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील,
- रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रॅक सुरू होतील.
- थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी असेल.
- सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे.
- ई कॉमर्स सुरू राहिल.
- जिम, सलून सुरू राहणार.
- बस वाहतूक १०० टक्के प्रवाशी क्षमतेने सुरु असेल.
- आंतरजिल्हा प्रवासाची मुभा राहिल
- इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील
जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी
- पहिल्या स्तर १८ जिल्हे
- दुसर्या स्तर ५
- तिसरा स्तर १०
- चौथ्या स्तर २ जिल्हे
स्तर -१
ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा. वाशिम, यवतमाळ
स्तर – २
मुंबई
- मुंबईत इतर व्यवहार सुरु होतील.
- पण लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी नसतील.
- या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार
- ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल
- उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार
दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार