मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या काळात बंद अलेल्या शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार अशी महत्त्वपुर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केल. कोरोनाच्या संसार्गामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंद होते. शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षण सुरु होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्या कारणामुळे शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. या प्रस्तावास मान्यता दिल्याने टास्क फोर्सच्या सुचनानुसार कोरोनाच्या आरोग्यविषयक सर्व सुचनांचे पालन करुन राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. राज्यातील निवासी शाळा संदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही.
शाळा सुरु करताना पालकांची मंजुरी आवश्यक आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण सक्तीचे आहे. कोरोना संसर्गाच्या पाश्वभुमीवर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या सुचनाचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे. ग्रामीण भागामध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ व शहरी भागामध्ये इयत्ता ८ वी ते इयत्ता १२वी वर्ग सुरु होणार आहेत. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळीज घेण्याची सुचना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षा या गोष्टींना प्राधान्य देण्यात यावे यांचा पुर्नउच्चार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला.
शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सांघीक कृती व सांघीक खेळ होणार नाहीत याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. शाळा सुरु होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी पाठविलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिल्यामुळे आता राज्यातील शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग भरणार आहेत. व मुलांची किलबील पुन्हा सुरु होणार आहे.