मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल हा ९४.२२ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेत १५३ विषयांचा समावेश होता. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
बारावीच्या निकालात मुलींची बाजी!
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच एचएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.
- दरवर्षीप्रमाणे कोकण पहिल्या स्थानावर आहे.
- कोकणाचा निकाल ९७.२१ टक्के असून मुंबईचा सर्वात कमी ९०.९१ टक्के लागला आहे.
- बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल ९५.३५ टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल ९३.२९ टक्के लागला आहे.
- मुलांपेक्षा २.०६ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
शाखेनुसार निकाल-
- विज्ञान – ९८.३०
- कला – ९०.५१
- वाणिज्य – ९१.७१
- व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४०
९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण!!
- या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४,४९,६६४ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती.
- त्यापैकी १४,३९,७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,५६,६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ३५५२७ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५३.०२ आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ६३३३ दिव्यांग विद्यार्थी होते. त्यापैकी ६३०१ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६००१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९५.२४ आहे.