मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात वाढता कोरोना संसर्ग पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्येत वाढ होतानाच दिसत आहे. यासाठी राज्य सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. दिल्ली-एनसीआरसह पाच राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यासाठी ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल. महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडला ‘उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे’ म्हणून घोषित केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि उत्तराखंडला संवेदनशील ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कोरोनाचा दुसरा स्ट्रेन थांबविण्यासाठी निर्णय
या आदेशानुसार या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी ४८ तास आधी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कोरोना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना उत्पत्तीची संवेदनशील ठिकाणे
- केरळ
- गोवा
- राजस्थान
- गुजरात
- दिल्ली-एनसीआर
- उत्तराखंड
पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती खुप वाईट होणार आहे दक्षता म्हणून पश्चिम बंगाल मधून येणाऱ्या वर सुद्धा निर्बंध घातले पाहिजेत