Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्राला तीन ‘परम विशिष्ट सेवा पदकं’, एकूण १४ ‘शौर्य पदकं’

January 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Army Officer

मुक्तपीठ टीम

 लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकर(सेवानिवृत्त) ,ले.जनरल मनोज पांडे  तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य ११ अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लष्कराच्या एकूण ३१७ आणि नौदलाच्या एकूण ३४ सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये २२ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), ४ ‘उत्तम युध्द सेवा पदक’(युवायएसएम), ४० ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम), ६ ‘शौर्य चक्र’, ८४ ‘सेना पदक’ (शौर्य), १० ‘युध्द सेवा पदक’, ४० ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा), ९३ ‘विशिष्ट सेवा पदक’ तसेच लष्कराच्या विविध ऑपरेशनसाठी ४४ पदक आणि नौदलाच्या ८ नौसेना पदकांचा समावेश आहे.

 

यामध्ये मुळचे महाराष्ट्राच्या असलेल्या लष्कर व नौदलाच्या सेना अधिकारी व जवानांना ३ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), २ ‘सेना पदक’ (शौर्य), २ ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा) आणि २ ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

 

 तीन सेनाधिकाऱ्यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’

लष्काराच्या सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि लेफ्टनंट जनरल मनोज  पांडे या लष्काराच्या दोन सेनाधिकाऱ्यांना तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना सर्वोच्च मानाचे परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

 

दोन  ‘सेना पदक’ (शौर्य)

१६ – मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे नायक निलेश मल्हारराव देशमुख आणि २४ – मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे शिपाई अण्णासाहेब निंगप्पा दुंडगे यांना ‘सेना पदक’ (शौर्य) जाहीर झाले आहे.

                                                  

दोन ‘सेना पदक’ (वि‍शिष्ट)

मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे ब्रिगेडीयर पराग केशवराव नांगरे आणि ८ – ग्रेनेडीयरचे कर्नल कौस्तुभ उल्हास केकरे  यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘सेना पदक’ (वि‍शिष्ट) जाहीर झाले आहे.

सात : ‘विशिष्ट सेवा पदक’

लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटचे मेजर जनरल कुलभूषण हनुमंत गवास, लष्कराच्या पोस्ट सेवेचे मेजर जनरल वसंत महेश दामोदर,इंटेलिजन्स कॉर्प्सचे कर्नल किरण नारायण कुलकर्णी, लष्कर अभियांत्रिकीचे कर्नल अजय लोंढे आणि आर्मोरेड कॉर्प्सचे लेफ्टनंट कर्नल महेश विष्णु जाधव यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.  तसेच, नौदलाचे कमोडोर विद्याधर हरके आणि कमांडर योगेश आठवले यांनाही ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.


Tags: ‘विशिष्ट सेवा पदकArmy Officer and Maharashtrakanya Lt. Gen. Madhuri Kanitkarbravery Medalgood newsIndian ArmyLt. Gen. Manoj Pandey RemoveMaharashtraMost Distinguished Service MedalmuktpeethNaval Vice Admiral Satish Kumar Ghormadeचांगल्या बातम्यानौदल व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडेपरम विशिष्ट सेवा पदकमहाराष्ट्रमुक्तपीठलष्कर सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकरले.जनरल मनोज पांडेशौर्य पदक
Previous Post

ऊसतोड कामगारांची नोंदणी प्राधान्याने पूर्ण करा – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Next Post

महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना पदकं जाहीर

Next Post
Balu Deshmukh

महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना पदकं जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!