मुक्तपीठ टीम
भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे पुन्हा एकदा बिहार पोलिसांच्या सेवेत परतणार आहेत. सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५ वर्षांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत दाखल झाले होते. आता त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपत आल्यानं ते लवकरचं बिहार पोलीस दलात रुजू होतील. शिवदीप लांडे यांची कामगिरी समीर वानखेडेंपेक्षा मोठी आहे.
शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले, ‘महाराष्ट्रामधील माझ्या कार्यकाळाचे पाच वर्ष पूर्ण झाले. मी डीआयजी (दहशतवाद विरोधी पथक, एटीएस मुंबई) म्हणून माझा कार्यभार सोपवत आहे. मी आता ‘आपल्या बिहार’मध्ये सेवा करण्यासाठी परत येत आहे. ‘ एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील एटीएस म्हणून शिवदीप लांडे यांचा शुक्रवार हा शेवटचा कामाचा दिवस होता आणि ते १ डिसेंबरपासून बिहार पोलिसात रुजू होतील.
शिवदीप लांडे यांचा कार्यकाळ
- शिवदीप लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
- अँटिलिया, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके असलेली एसयूव्ही आणि नंतर उद्योगपती मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू या प्रकरणाचा त्यांनी तपास केला होता.
- तेजस्वी आणि दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातील शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
- त्यांची कन्या डॉ.ममता शिवतारे या शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.
- जानेवारी २०१५ मध्ये, पाटणा येथील डाक बंगला चौकात इन्स्पेक्टर सर्वचंदला फिल्मी स्टाईलमध्ये ओढणी घालून पकडल्याच्या प्रकरणात शिवदीप चर्चेत आले होते.
मुंबईही गाजवली! एनसीबीच्या वानखेडेंनी छोटे ड्रग पेडलर, तर लांडेंनी मोठे सप्लायर पकडले!
- समीर वानखेडे यांनी ज्यावेळी एनसीबीमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवदीप लांडे यांची त्याचवेळी DIG मध्ये पदोन्नती झाली आणि त्यांचे सप्टेंबर, २०२० मध्ये एएनसीमध्ये महाराष्ट्र एटीएसमध्ये ट्रान्सफर झाले होते.
- त्यापूर्वी त्यांनी मुंबईत ५०० हून अधिक आरोपींना अटक केले होते आणि हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते.
- एटीएसमध्ये असतानाही त्यांनी ड्रग्जचा एक मोठी केस शोधून काढली होती, ज्याचे कनेक्शन हिमाचल प्रदेशशी होता.
- लांडे यांनी केतन पारीखचा साथीदार निरंजन शहा याला दिल्लीतून अटक केली होती.
- सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर समीर वानखेडेंना एनसीबीमध्ये आणण्यात आले होते.
- या काळात त्याने रिया चक्रवर्तीला अटक केल्यापासून, आर्यन खानला पकडले आणि अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावले, त्यामुळे ते मुख्यतः चर्चेत आले.
- परंतु मुंबई पोलिसातील अनेक अधिकारी असा दावा करतात की समीर वानखेडेंनी छोटे ड्रग पेडलर पकडले तर तर लांडेंनी मोठे सप्लायर पकडले.
- याचा अर्थ ते पेडलर्सपेक्षा ड्रग माफियांपर्यंत पोहोचले. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये छापे टाकले, जिथून चरस मुंबईला जायचा.
त्यांची टीम आंध्र प्रदेशातील त्या भागात पोहोचली जिथून मुंबईला भांग पुरवठा केला जात होता. - त्यांच्याकडून एका प्रकरणात एक हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.