महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २३ मार्च २०२१ आज राज्यात २८,६९९ नवीन रुग्णांचे निदान. आज १३,१६५ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात सध्या एकूण २,३०,६४१ सक्रिय रुग्ण आहेत राज्यात आजपर्यंत एकूण २२,४७,४९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.७३ % एवढे झाले आहे. राज्यात आज १३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . १३२ मृत्यूंपैकी ७४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८५,८४,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,३३,०२६ (१३.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७७,२६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.