मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १३२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १३५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२६,४६१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.११% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ६ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेलीआहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९६,६६,२४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७५,०८०(०९.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ८०३ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईतून बडोद्याला गेलेल्या प्रवाशात XE व्हेरिएंट
मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या एका 67 वर्षीय पुरुषांमध्ये एक्स ईव्हेरियंटआढळल्याचे आज एन.सी.डी.सी. नवी दिल्ली यांनी स्पष्ट केले आहे. सदर रुग्णाला बडोद्यामध्ये 12 मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षण विरहित आहे. या रुग्णाने कोविशील्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात १३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७५,०८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ५५
- ठाणे १
- ठाणे मनपा २
- नवी मुंबई मनपा ६
- कल्याण डोंबवली मनपा ०
- उल्हासनगर मनपा ०
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ०
- पालघर ०
- वसईविरार मनपा १
- रायगड २
- पनवेल मनपा २
- ठाणे मंडळ एकूण ६९
- नाशिक ०
- नाशिक मनपा १
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर १
- अहमदनगर मनपा ०
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६
- पुणे ८
- पुणे मनपा २३
- पिंपरी चिंचवड मनपा ९
- सोलापूर १
- सोलापूर मनपा ०
- सातारा १
- पुणे मंडळ एकूण ४२
- कोल्हापूर ०
- कोल्हापूर मनपा ०
- सांगली ०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ३
- कोल्हापूर मंडळ एकूण ३
- औरंगाबाद ०
- औरंगाबाद मनपा १
- जालना ०
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण २
- लातूर ०
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ०
- बीड ०
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ०
- अकोला ०
- अकोला मनपा ५
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ०
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ५
- नागपूर ०
- नागपूर मनपा २
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ५
एकूण १३२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, ०९ एप्रिल २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.