मुक्तपीठ टीम
देशभर वाखाणणी झालेल्या कोरोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलप्रमाणेच आता विदर्भातील कोरोना नियंत्रणाचं यशही कौतुक करावं असं आहे. राज्यातील इतर विभागांप्रमाणेच विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांमध्येही कोरोना महामारीनं गंभीर स्वरुप धारण केलं होतं. त्यातही अमरावती, नागपूर जास्तच प्रभावित झाले होते. काही दिवस बुलढाणाही. पण गेले काही दिवस विदर्भातील आकडेवारी सातत्याने कमी राहत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नव्या रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसताना विदर्भात मात्र गुरुवारी दिवसभरात फक्त १५६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या महाराष्ट्रातील सर्वाधिक नव्या रुग्णसंख्येच्या एका जिल्ह्यात १,५१६ म्हणजेच विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांच्या दहापट नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे विदर्भातील अमरावती आणि नागपूर या दोन्ही विभागांच्या कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करुन तसं काही वेगळं मॉडेल असेल तर ते पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि बीडसारख्या ठिकाणी अंमलात आणण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील कोरोना आकड्यांमध्ये
- गुरुवारी राज्यात ९,११४ नवीन रुग्णांचे निदान.
- गुरुवारी ८,८१५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,८९,९८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०५ % एवढे झाले आहे.
- राज्यात गुरुवारी १२१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ % एवढा आहे.
- गुरुवारीपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३३,५०,२५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,३१,९७६ (१४.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,२४,५११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,५७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात गुरुवारी एकूण १,१४,४४४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,३२४ (कालपेक्षा कमी)
- महामुंबई ०१,९०६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा कमी)
- कोकण ००,६५२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा कमी)
- उ. महाराष्ट्र ००,६९६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,३८० (कालपेक्षा कमी)
- विदर्भ ००,१५६ (कालपेक्षा वाढ)
एकूण ९ हजार ११४ (कालपेक्षा कमी)
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
गुरुवारी राज्यात ९,११४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,३१,९७६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ५३२
- ठाणे १३५
- ठाणे मनपा १२०
- नवी मुंबई मनपा ११९
- कल्याण डोंबवली मनपा १४२
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा ४९
- पालघर ७६
- वसईविरार मनपा ९१
- रायगड ४७२
- पनवेल मनपा १५२
- ठाणे मंडळ एकूण १९०६
- नाशिक १५५
- नाशिक मनपा ७०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४२७
- अहमदनगर मनपा २६
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव ११
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण ६९६
- पुणे ६४४
- पुणे मनपा ३५७
- पिंपरी चिंचवड मनपा २६३
- सोलापूर २९७
- सोलापूर मनपा १३
- सातारा ९४३
- पुणे मंडळ एकूण २५१७
- कोल्हापूर ११५७
- कोल्हापूर मनपा ३५९
- सांगली ११११
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८०
- सिंधुदुर्ग २६१
- रत्नागिरी ३९१
- कोल्हापूर मंडळ एकूण ३४५९
- औरंगाबाद ११२
- औरंगाबाद मनपा ५
- जालना १३
- हिंगोली १
- परभणी १४
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण १४७
- लातूर २३
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ५०
- बीड १४९
- नांदेड ५
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण २३३
- अकोला ८
- अकोला मनपा १
- अमरावती २०
- अमरावती मनपा ६
- यवतमाळ ५
- बुलढाणा २५
- वाशिम १५
- अकोला मंडळ एकूण ८०
- नागपूर ३
- नागपूर मनपा १८
- वर्धा ५
- भंडारा ३
- गोंदिया ५
- चंद्रपूर ७
- चंद्रपूर मनपा १०
- गडचिरोली २५
- नागपूर एकूण ७६
एकूण ९ हजार ११४
(टीप- गुरुवारी नोंद झालेल्या एकूण १२१ मृत्यूंपैकी ९० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३१८ ने वाढली आहे. हे ३१८ मृत्यू, रायगड-७३, पुणे-५९, ठाणे-४१, लातूर-२७, पालघर-२६, सांगली-१६, कोल्हापूर-१०, अहमदनगर-९, बुलढाणा-९, नाशिक-७, सोलापूर-७, उस्मानाबाद-६, नागपूर-४, रत्नागिरी-३, सातारा-३, सिंधुदूर्ग-३, औरंगाबाद-२, जाळगाव-२, जालना-२, परभणी-२, अकोला-१, अमरावती-१, बीड-१, चंद्रपूर-१, हिंगोली-१, नांदेड-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत.
गुरुवारी मुंबईच्या बाधित रुग्ण संख्येचे रेकाँसिलिएशन करण्यात आले आहे रहिवासी पत्त्यानुसार रूग्ण इतर जिल्ह्यांमध्ये दाखविण्यात आल्याने तसेच दुहेरी नोंद असलेले रुग्ण वगळल्याने मुंबईतील एकूण रुग्ण संख्येत ७७३ ची घट झाली आहे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७४२ ने वाढली आहे तर राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३१ ने कमी झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ८ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.