मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३१४२ नवीन रुग्णांचे निदान .
- आज ३९७४ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७८,२५,११४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९०% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ७करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२२,२०,५१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,९३,०५१(०९.७२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १९९८१ सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.५ आणि बी ए. ४ व्हेरीयंटचे आणखी ९ रुग्ण :-
बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार बीए.५ व्हेरीयंटचे ६ आणि बी ए.४ चे ३ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.या शिवाय बीए. २.७५ या वेरियंटचे राज्यात एकूण १० रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.हे सर्व नमुने २१ जून ते २९ जून २०२२ या कालावधीतील आहेत.हे सर्व रुग्ण लक्षणविरहित असून ते घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ७३ झाली आहे. या पैकी पुण्यात २४, मुंबईत ३४,नागपूर, ठाणे आणि पालघर येथे प्रत्येकी ४ तर रायगड मध्ये ३ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ३१४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,९३,०५१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ६९५
- ठाणे ४२
- ठाणे मनपा १४५
- नवी मुंबई मनपा ११५
- कल्याण डोंबवली मनपा ४८
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा २७
- पालघर ८
- वसईविरार मनपा ३८
- रायगड ८९
- पनवेल मनपा ६८
- ठाणे मंडळ एकूण १२९२
- नाशिक ६
- नाशिक मनपा २७
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर २५
- अहमदनगर मनपा ४
- धुळे १०
- धुळे मनपा ८
- जळगाव १०
- जळगाव मनपा ४
- नंदूरबार ५
- नाशिक मंडळ एकूण १०१
- पुणे २४३
- पुणे मनपा ६०७
- पिंपरी चिंचवड मनपा २८१
- सोलापूर २०
- सोलापूर मनपा २८
- सातारा ६६
- पुणे मंडळ एकूण १२४५
- कोल्हापूर ७
- कोल्हापूर मनपा ६
- सांगली ८
- सांगली मिरज कुपवाड मनपा १४
- सिंधुदुर्ग ६
- रत्नागिरी २९
- कोल्हापूर मंडळ एकूण ७०
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ७०
- जालना ४७
- हिंगोली ६
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १३३
- लातूर ११
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद १२
- बीड ५
- नांदेड २
- नांदेड मनपा ८
- लातूर मंडळ एकूण ४१
- अकोला ८
- अकोला मनपा ८
- अमरावती ३
- अमरावती मनपा १३
- यवतमाळ ७
- बुलढाणा १९
- वाशिम ५०
- अकोला मंडळ एकूण १०८
- नागपूर ३१
- नागपूर मनपा ७१
- वर्धा १६
- भंडारा १६
- गोंदिया १
- चंद्रपूर ९
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली २
- नागपूर एकूण १५२
एकूण ३१४२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या बुधवार, ०६ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.