मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता वाढली आहे. यापूर्वी डोंबिवलीत सापडलेला एक रुग्ण आणि आज सरकारी प्रेस नोटनुसार सापडलेल्या सात रुग्णांमुळे ओमायक्रोन रुग्णांची एकूण संख्या आठवर पोहचली आहे.
ओमायक्रॉन विषाणू संसर्ग माहिती
नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे.
तसेच पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे. याआधी डोंबिवलीत एका तरुणाला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.
यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे, अशी माहिती सरकारी प्रेसनोटनुसार मिळाली आहे.
दिवसभरातील कोरोनाविषयक ठळक माहिती:
- आज राज्यात ७०७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६७७ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८६,७८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६०,७८,६१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३८,७७८ (१०.०५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७८,८५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ९१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७,१५१ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३६४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,१९७
- उ. महाराष्ट्र ०,०७३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०४७
- कोकण ०,००६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२०
नवे रुग्ण ०,७०७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ७०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३८,७७८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा २०७
- ठाणे १८
- ठाणे मनपा ३८
- नवी मुंबई मनपा ३१
- कल्याण डोंबवली मनपा २६
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४
- पालघर ३
- वसईविरार मनपा १३
- रायगड ८
- पनवेल मनपा १३
- ठाणे मंडळ एकूण ३६४
- नाशिक १५
- नाशिक मनपा २०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर २७
- अहमदनगर मनपा ८
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७३
- पुणे ३९
- पुणे मनपा ८३
- पिंपरी चिंचवड मनपा ३९
- सोलापूर ७
- सोलापूर मनपा ०
- सातारा १७
- पुणे मंडळ एकूण १८५
- कोल्हापूर ४
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली ५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी ५
- कोल्हापूर मंडळ एकूण १८
- औरंगाबाद ४
- औरंगाबाद मनपा १३
- जालना ६
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण २५
- लातूर ०
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ८
- बीड ५
- नांदेड २
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण २२
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ४
- बुलढाणा ०
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ६
- नागपूर ०
- नागपूर मनपा ९
- वर्धा १
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १४
एकूण ७०७
(नोट: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०५ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.