मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस आणखी दिलासा देणारा आहे. आज महाराष्ट्रात १५ हजार ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णसंख्या खाली जाताना दिसत असतानाच ३३ हजार म्हणजे नव्या रुग्णांच्या दुपटीपेक्षाही जास्त बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्यूसंख्याही दोन दिवसांमध्ये १३३ वर घसरली आहे. त्यातच मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांसाठीही सोमवारचा दिवस कमी रुग्णसंख्या नोंदवणारा ठरला. फक्त काहीशी काळजी वाटावी अशी परिस्थिती सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांप्रमाणेच नाशिक विभागातून आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात १५,०७७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३३,००० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज १८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १८४ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५३,९५,३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण २,५३,३६७ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८८% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १८,७०,३०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १०,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,९०४ (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०३,१२४ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०१,९५२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०१,५९९ (कालपेक्षा किंचित वाढ)
- मराठवाडा ०१,३५१ (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,१४७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण १५ हजार ०७७ (कालपेक्षा ३,५२३ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १५ हजार ०७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,४६,८९२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ६६६
- ठाणे १५५
- ठाणे मनपा ११५
- नवी मुंबई मनपा ५८
- कल्याण डोंबवली मनपा ११४
- उल्हासनगर मनपा १८
- भिवंडी निजामपूर मनपा ४
- मीरा भाईंदर मनपा ९७
- पालघर १८२
- वसईविरार मनपा १२६
- रायगड ३२६
- पनवेल मनपा ९१
- ठाणे मंडळ एकूण १९५२
- नाशिक १७००
- नाशिक मनपा ३५८
- मालेगाव मनपा ९
- अहमदनगर ७९२
- अहमदनगर मनपा ४२
- धुळे ४९
- धुळे मनपा १५
- जळगाव ९८
- जळगाव मनपा ३४
- नंदूरबार २७
- नाशिक मंडळ एकूण ३१२४
- पुणे ६२१
- पुणे मनपा १९४
- पिंपरी चिंचवड मनपा २३०
- सोलापूर ४३६
- सोलापूर मनपा २८
- सातारा १७१३
- पुणे मंडळ एकूण ३२२२
- कोल्हापूर १४४२
- कोल्हापूर मनपा ३९६
- सांगली ७४१
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०३
- सिंधुदुर्ग ५९०
- रत्नागिरी ५५७
- कोल्हापूर मंडळ एकूण ३८२९
- औरंगाबाद १३७
- औरंगाबाद मनपा ८७
- जालना ५७
- हिंगोली ४९
- परभणी ४३
- परभणी मनपा १२
- औरंगाबाद मंडळ एकूण ३८५
- लातूर ६९
- लातूर मनपा २३
- उस्मानाबाद ३३३
- बीड ४९४
- नांदेड ३८
- नांदेड मनपा ९
- लातूर मंडळ एकूण ९६६
- अकोला ८३
- अकोला मनपा ७७
- अमरावती २१८
- अमरावती मनपा ८०
- यवतमाळ २१२
- बुलढाणा ३९
- वाशिम १६४
- अकोला मंडळ एकूण ८७३
- नागपूर ११०
- नागपूर मनपा १९८
- वर्धा ४०
- भंडारा ८३
- गोंदिया ४७
- चंद्रपूर १२७
- चंद्रपूर मनपा ४२
- गडचिरोली ७९
- नागपूर एकूण ७२६
एकूण १५ हजार ०७७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १८४ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३१६ ने वाढली आहे. हे ३१६ मृत्यू, पुणे-८५, नागपूर- ३४, लातूर-२८, अहमदनगर- २४, पालघर- २३, औरंगाबाद- १७, सातारा- १७, गोंदिया- १३, नांदेड- ११, अकोला- १०, नाशिक- १०, बीड- ७, ठाणे- ७, नंदूरबार- ६, कोल्हापूर- ५, सांगली- ५, सोलापूर- ४, यवतमाळ- ३, भंडारा- २, बुलढाणा- १, गडचिरोली- १, उस्मानाबाद- १, वर्धा- १ आणि रत्नागिरी- १ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ३१ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.)