मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात दुसऱ्यांदा उफाळलेली कोरोना संसर्गाची लाट वाढतच चालली आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात ४९ हजार ४४७ नवे रुग्ण सापडले. तर मुंबई मनपासह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महामुंबई परिसरात १५ हजार ९८९ रुग्ण सापडले. त्याचवेळी पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपासह पुण्यात १० हजार ८७३ रुग्णांचे निदान झाले आहे. नाशिक आणि नागपूरमधील नव्या रुग्णांची संख्या चार हजारापर्यंत राहिली आहे.
कोरोना आकड्यांमध्ये…
- आज राज्यात ४९,४४७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३७,८२१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २४,९५,३१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.४९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २७७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २९,५३,५२३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ९,१०८
- ठाणे ७०३
- ठाणे मनपा १,४८२
- नवी मुंबई मनपा १,३२७
- कल्याण डोंबवली मनपा १,२७८
- उल्हासनगर मनपा १६२
- भिवंडी निजामपूर मनपा १३९
- मीरा भाईंदर मनपा ४००
- पालघर १९३
- वसईविरार मनपा ३७५
- रायगड २५६
- पनवेल मनपा ५६६
- महामुंबई परिसर एकूण १५,९८९
- नाशिक १,४४१
- नाशिक मनपा २,४५९
- मालेगाव मनपा ६३
- अहमदनगर १,४६४
- अहमदनगर मनपा ५००
- धुळे २३०
- धुळे मनपा १३७
- जळगाव ८३२
- जळगाव मनपा ४७२
- नंदूरबार ८२०
- पुणे २,२९७
- पुणे मनपा ५,७७८
- पिंपरी चिंचवड मनपा २,७९८
- पुणे जिल्हा एकूण १०,८७३
- सोलापूर ४१२
- सोलापूर मनपा २९५
- सातारा ६८८
- कोल्हापूर ९७
- कोल्हापूर मनपा ८७
- सांगली १५५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४९
- सिंधुदुर्ग ७०
- रत्नागिरी ५७
- औरंगाबाद ४३४
- औरंगाबाद मनपा ७०४
- जालना ४०७
- हिंगोली ७७
- परभणी १०१
- परभणी मनपा १५४
- लातूर ३९०
- लातूर मनपा २८८
- उस्मानाबाद ३४९
- बीड ४४८
- नांदेड ७१४
- नांदेड मनपा ५०४
- अकोला १५३
- अकोला मनपा १६४
- अमरावती १४७
- अमरावती मनपा १०६
- यवतमाळ २३६
- बुलढाणा ८४९
- वाशिम २८५
- नागपूर १,०९०
- नागपूर मनपा २,८५३
- वर्धा ३००
- भंडारा ८३७
- गोंदिया २५०
- चंद्रपूर २२९
- चंद्रपूर मनपा १२४
- गडचिरोली ६४
एकूण ४९,४४७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७८ मृत्यू, पुणे-२२, औरंगाबाद-२१, नागपूर-१६, ठाणे-६, यवतमाळ-५, नाशिक-२, अकोला-१, बुलढाणा-१, हिंगोली-१, लातूर-१, नांदेड-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
हा अहवाल ३ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे. | |