मुक्तपीठ टीम
आज महाराष्ट्रात कोरोनाचे ३१ हजार ६४३ नवे रुग्ण सापडले. त्याचवेळी २० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरीही परतले. मुंबई मनपासह सभोतालच्या तीन जिल्ह्यातील महामुंबईचा परिसर आता कोरोनासाठी सुपर हॉटस्पॉट ठरत आहे. त्यानंतर पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपासह पुणे जिल्हा, नाशिक, मालेगाव मनपासह नाशिक जिल्हा आणि नागपूर मनपासह नागपूर जिल्हा हे कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट ठरत आहे. आज महामुंबई परिसरात राज्याच्या नव्या रुग्णांपैकी एक तृतीयांश नवे रुग्ण नोंदवले गेले. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे.
गेल्या ४८ तासात राज्यात ८५ मृत्यूंची नोंद झाली. एकूण १०२ मृत्यूंची दिवसभरातील नोंद आहे, पण ते आज एका दिवसातील नाही. त्यापैकी ८५ मृत्यू हे दोन दिवसातील आहेत. तर उरलेले त्याआधीचे आहेत.
- आज राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २३,५३,३०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज १०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. १०२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आता एकूण ३,३६,५८४ सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ % एवढा आहे.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.७१% एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,४५,५१८ (१४.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण:
आज राज्यात ३१,६४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २७,४५,५१८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ५८९०
- ठाणे ५४४
- ठाणे मनपा १०१०
- नवी मुंबई मनपा ५९८
- कल्याण डोंबवली मनपा ९३४
- उल्हासनगर मनपा ८१
- भिवंडी निजामपूर मनपा ७७
- मीरा भाईंदर मनपा २८३
- पालघर ९९
- वसईविरार मनपा १९१
- रायगड १४५
- पनवेल मनपा ३२९
- नाशिक ८२५
- नाशिक मनपा १८९२
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर ८२५
- अहमदनगर मनपा ४७०
- धुळे २५६
- धुळे मनपा १२७
- जळगाव ६८४
- जळगाव मनपा १९९
- नंदूरबार ३७७
- पुणे ९३७
- पुणे मनपा २५५४
- पिंपरी चिंचवड मनपा १४८१
- सोलापूर ३३२
- सोलापूर मनपा १२१
- सातारा ४६०
- कोल्हापूर ५९
- कोल्हापूर मनपा ५९
- सांगली १४४
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०५
- सिंधुदुर्ग २७
- रत्नागिरी ६०
- औरंगाबाद १२६
- औरंगाबाद मनपा ८०३
- जालना २५६
- हिंगोली ४३
- परभणी २१७
- परभणी मनपा १९०
- लातूर १८३
- लातूर मनपा २०६
- उस्मानाबाद ३२३
- बीड ३९८
- नांदेड ३३०
- नांदेड मनपा ६७८
- अकोला ३९
- अकोला मनपा ११५
- अमरावती ३०१
- अमरावती मनपा १२८
- यवतमाळ ३०३
- बुलढाणा ४३५
- वाशिम ४२६
- नागपूर ९६२
- नागपूर मनपा २२८१
- वर्धा २६४
- भंडारा २३९
- गोंदिया १२४
- चंद्रपूर ४४
- चंद्रपूर मनपा २८
- गडचिरोली २२
इतर राज्ये /देश ०
एकूण ३१६४३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १०२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू ठाणे-२ आणि अकोला-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २९ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.