मुक्तपीठ टीम
दर सोमवारी जे घडतं तेच आजच्या सोमवारीही घडले आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या खूपच कमी दिसते आहे. दर सोमवारी असाच अनुभव आहे. आज राज्यात ६ हजार ७२७ नवे रुग्ण सापडले. तर १० हजार ८१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारपेक्षा आज राज्यात ३ हजार २४७ नवे रुग्ण कमी आहेत. मृत्यूंची संख्याही आजच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दिवसात म्हणजेच ४८ तासात फक्त ८६ आहे. यामुळे आठवड्यातील सर्वच वार हे सोमवारसारखे असले तर बरं, असंच भासू शकतं. प्रत्यक्षात तसं रविवारच्या वीकेंड मूडमुळे कमी होणाऱ्या कामामुळे घडत असण्याची शक्यता आहे.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात ६,७२७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,८१२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,००,९२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १०१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १०१ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ (१४.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१७,८७४ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०३,४७० (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०१,५७८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,७०९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,५१० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,२९९ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००,१६१ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण ६ हजार ७२७
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ६,७२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६०,४३,५४८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ६११
- ठाणे ८८
- ठाणे मनपा ९८
- नवी मुंबई मनपा ९५
- कल्याण डोंबिवली मनपा ६४
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा ५६
- पालघर ५५
- वसईविरार मनपा ९९
- रायगड २५८
- पनवेल मनपा १४१
- ठाणे मंडळ एकूण १५७८
- नाशिक १७६
- नाशिक मनपा ८५
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर २२१
- अहमदनगर मनपा २
- धुळे ३
- धुळे मनपा २
- जळगाव १२
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार ५
- नाशिक मंडळ एकूण ५१०
- पुणे ३७५
- पुणे मनपा १६२
- पिंपरी चिंचवड मनपा १७८
- सोलापूर २२१
- सोलापूर मनपा १४
- सातारा ४७९
- पुणे मंडळ एकूण १४२९
- कोल्हापूर ९१७
- कोल्हापूर मनपा ३८७
- सांगली ६०५
- सांगली मिरज कुपवाड मनपा १३२
- सिंधुदुर्ग ३४६
- रत्नागिरी ३६३
- कोल्हापूर मंडळ एकूण २७५०
- औरंगाबाद ३१
- औरंगाबाद मनपा १३
- जालना १६
- हिंगोली ८
- परभणी ३४
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण १०६
- लातूर १०
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ४२
- बीड १३०
- नांदेड ३
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १९३
- अकोला ४
- अकोला मनपा ४
- अमरावती १६
- अमरावती मनपा ६
- यवतमाळ ८
- बुलढाणा ५७
- वाशिम ७
- अकोला मंडळ एकूण १०२
- नागपूर ५
- नागपूर मनपा २२
- वर्धा ०
- भंडारा १
- गोंदिया ४
- चंद्रपूर ४
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली २०
- नागपूर एकूण ५९
एकूण ६ हजार ७२७
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १०१ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १८६ ने वाढली आहे. हे १८६ मृत्यू, ठाणे–६६, पुणे–३५, पालघर–३०, नाशिक–१६, परभणी–८, रायगड–८, उस्मानाबाद–६, रत्नागिरी–३, अकोला–२, धुळे–२, लातूर–२, सातारा–२, औरंगाबाद–१, बुलढाणा–१, जळगाव–१, नांदेड–१, सांगली–१ आणि वाशिम–१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ जून २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.