मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढताच आहे. आज राज्यात ४०, ४१४ नवे कोरोना रुग्ण सापडले. कालच्या संख्येशी तुलना करता आज नवे रुग्ण ४ हजार ७८८ ने जास्त आहेत. त्यातही सर्वात भयावह वाढ मुंबई मनपासह सभोतालच्या ठाणे, पालघर, रायगड या तीन जिल्ह्यांमधील शहरी-ग्रामीण महामुंबई परिसरात दिसत आहे. आज एका दिवसात महामुंबई परिसरात १२ हजार ३१९ नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्हा म्हणून विचार केला तर सर्वात जास्त नवे रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या चार जिल्ह्यांचीही स्थिती धोकादायकच आहे.
आकड्यांमध्ये कोरोना उद्रेक
- आज राज्यात ४०,४१४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १७,८७४ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आता एकूण ३,२५,९०१ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आज १०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण १०८ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत
- सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे.
- राज्यात आजपर्यंत एकूण २३,३२,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.९५% एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४०,४१४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २७,१३,८७५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ६९३३
- ठाणे ६१४
- ठाणे मनपा १२१७
- नवी मुंबई मनपा ८१५
- कल्याण डोंबवली मनपा १०८१
- उल्हासनगर मनपा २१२
- भिवंडी निजामपूर मनपा ६४
- मीरा भाईंदर मनपा २७१
- पालघर १६६
- वसईविरार मनपा ३२४
- रायगड २५२
- पनवेल मनपा ३७०
- नाशिक ११५९
- नाशिक मनपा २४०३
- मालेगाव मनपा ५१
- अहमदनगर ८३१
- अहमदनगर मनपा ३८०
- धुळे ६२४
- धुळे मनपा २२३
- जळगाव ७३९
- जळगाव मनपा १८५
- नंदूरबार १७८
- पुणे १५६८
- पुणे मनपा ४६२५
- पिंपरी चिंचवड मनपा २१३१
- सोलापूर ३९५
- सोलापूर मनपा २००
- सातारा ४००
- कोल्हापूर ३६
- कोल्हापूर मनपा ३८
- सांगली १३२
- सांगली मिरज कुपवाड मनपा ८०
- सिंधुदुर्ग ७१
- रत्नागिरी २४
- औरंगाबाद १९५
- औरंगाबाद मनपा १०३१
- जालना ३४९
- हिंगोली ८१
- परभणी १३४
- परभणी मनपा १९६
- लातूर २३९
- लातूर मनपा २४६
- उस्मानाबाद २३७
- बीड २९७
- नांदेड ४४१
- नांदेड मनपा ७७०
- अकोला २००
- अकोला मनपा २८०
- अमरावती ३१६
- अमरावती मनपा १९४
- यवतमाळ ३४८
- बुलढाणा ३०४
- वाशिम ४२६
- नागपूर १०१८
- नागपूर मनपा २९८१
- वर्धा ३७०
- भंडारा ४२५
- गोंदिया १०३
- चंद्रपूर २८२
- चंद्रपूर मनपा ११७
- गडचिरोली ४२
- इतर राज्ये /देश ०
एकूण ४०४१४
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १०८ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू अकोला-५, पुणे-३, सोलापूर-३, ठाणे-३, वाशिम-२, नंदुरबार-१, कोल्हापूर-१, जालना-१ आणि नागपूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या २८ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.