मुक्तपीठ टीम
आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २० रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. त्यापैकी ५४ बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचवेळी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढते आहे. आज राज्यात १४१० नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ८६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
कोरोना ठळक माहिती
- आज राज्यात १४१० नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८६८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०१,२४३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८२,३५,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५४,७५५ (९.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८६,८१५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ८८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ८,४२६ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती
आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २० रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील १४ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत.
- हे २० रुग्ण पुढीप्रमाणे आहेत –
- पुणे -६ (पुणे मनपा-१, पुणे छावणी बोर्ड-५)
- मुंबई -११
- सातारा – २
- अहमदनगर -१
यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या १०८ झाली आहे.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ४६* |
२ | पिंपरी चिंचवड | १९ |
३ | पुणे ग्रामीण | १५ |
४ | पुणे मनपा | ७ |
५ | सातारा | ५ |
६ | उस्मानाबाद | ५ |
७ | कल्याण डोंबिवली | २ |
८ | बुलढाणा | १ |
९ | नागपूर | २ |
१० | लातूर | १ |
११ | वसई विरार | १ |
१२ | नवी मुंबई | १ |
१३ | ठाणे मनपा | १ |
१४ | मीरा भाईदर | १ |
१५ | अहमदनगर | १ |
एकूण | १०८ | |
*यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
यापैकी ५४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या २० ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- आज रिपोर्ट झालेल्या २० रूग्णापैकी १५ हे आंतररष्ट्रीय प्रवासी, १ आंतरदेशीय प्रवासी तर ४ जण त्यांचे निकटसहवासित आहेत.
- यातील १ जण ही १८ वर्षाखालील बालक आहे तर ६ जण ६० वर्षांवरील आहेत.
- आजाराचे स्वरूप : सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत
- लसीकरण : १२ रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, ७ रुग्णांचे लसीकरण झाले नाही, तर १ रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत .
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२३९३३ | १३९६२० | १६३५५३ | २३९३३ | ६४१२ | ३०३४५ | १२७ | ४९ | १७६ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७२२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १५७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०,९६२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२८९
- उ. महाराष्ट्र ०,११२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०२५
- कोकण ०,००२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०२०
- एकूण रुग्ण १,४१०
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १४१० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,५४,७५५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ६७३
- ठाणे २५
- ठाणे मनपा ५४
- नवी मुंबई मनपा ७५
- कल्याण डोंबवली मनपा १७
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा २४
- पालघर ९
- वसईविरार मनपा ३०
- रायगड १५
- पनवेल मनपा ३४
- ठाणे मंडळ एकूण ९६२
- नाशिक १२
- नाशिक मनपा ३३
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५१
- अहमदनगर मनपा १२
- धुळे ०
- धुळे मनपा २
- जळगाव ०
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ११२
- पुणे ६९
- पुणे मनपा १२२
- पिंपरी चिंचवड मनपा ५९
- सोलापूर ७
- सोलापूर मनपा ३
- सातारा १५
- पुणे मंडळ एकूण २७५
- कोल्हापूर ५
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा २
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी २
- कोल्हापूर मंडळ एकूण १६
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ५
- जालना ३
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ११
- लातूर १
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ४
- बीड २
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १४
- अकोला ०
- अकोला मनपा २
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ १
- बुलढाणा १
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण ६
- नागपूर १
- नागपूर मनपा ११
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १४
एकूण १४१०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २४ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.