मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात आज कोरोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले आहे. नागपूर मनपा आणि जिल्ह्याचा एकत्रित विचार केला तर सर्वाधिक ७७३ नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबई मनपाच्या हद्दीतील शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये ७६१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. रविवारी निदान झालेल्या रुग्णांपेक्षा आज राज्याचा आकडा १७६१ने कमी झाला असला, तरीही कोरोना संसर्गाची गंभीरता कमी झालेली नाही. नव्या रुग्णांपेक्षा राज्यात रुग्ण बरे होण्याचा आकडा फक्त १७५ने कमी असल्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा जास्त वाढलेला नाही.
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – दिनांक २२ फेब्रुवारी २०२१
- आज राज्यात ५,२१० नवीन रुग्णांचे निदान
- आज राज्यात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण १९,९९,९८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे.
- राज्यात सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण ५३,११३ आहेत
- राज्यात आज १८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४६ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,०६,०९४ (१३.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
करोना बाधित रुग्ण
आज राज्यात ५,२१० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली आहे. तर राज्यात सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण ५३,११३ आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिका ७६१
ठाणे ०६३
ठाणे मनपा १३२
नवी मुंबई मनपा १०८
कल्याण डोंबवली मनपा १३४
उल्हासनगर मनपा ०११
भिवंडी निजामपूर मनपा ००४
मीरा भाईंदर मनपा ०२७
पालघर ०१५
वसईविरार मनपा ०२२
रायगड ०३४
पनवेल मनपा ०५३
ठाणे मंडळ एकूण १३६४
नाशिक ०५४
नाशिक मनपा १२७
मालेगाव मनपा ०१२
अहमदनगर ०८१
अहमदनगर मनपा ०३९
धुळे ००५
धुळे मनपा ०३३
जळगाव ०७०
जळगाव मनपा ०६५
नंदूरबार ००६
नाशिक मंडळ एकूण ४९२
पुणे १४५
पुणे मनपा ३३६
पिंपरी चिंचवड मनपा २०७
सोलापूर ०३७
सोलापूर मनपा ०२९
सातारा ०९०
पुणे मंडळ एकूण ८४४
कोल्हापूर ००३
कोल्हापूर मनपा ००३
सांगली ००८
सांगली मिरज कुपवाड ००२
सिंधुदुर्ग ००९
रत्नागिरी ००२
कोल्हापूर मंडळ एकूण ०२७
औरंगाबाद ०२०
औरंगाबाद मनपा १९४
जालना ०२३
हिंगोली ०१८
परभणी ००५
परभणी मनपा ०१५
औरंगाबाद मंडळ एकूण २७५
लातूर ००७
लातूर मनपा ०२८
उस्मानाबाद ००५
बीड ०३९
नांदेड ००८
नांदेड मनपा ०२१
लातूर मंडळ एकूण १०८
अकोला ०५९
अकोला मनपा १६७
अमरावती ०९४
अमरावती मनपा ५५५
यवतमाळ ०९४
बुलढाणा १३५
वाशिम ०५०
अकोला मंडळ एकूण ११५४
नागपूर १३०
नागपूर मनपा ६४३
वर्धा ०९०
भंडारा ०१९
गोंदिया ०१४
चंद्रपूर ०२१
चंद्रपूर मनपा ०१४
गडचिरोली ०१५
नागपूर एकूण ९४६
इतर राज्ये /देश ०००
एकूण ५२१०
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण १८ मृत्यूंपैकी ६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू नाशिक-२ आणि लातूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या २२ फेब्रुवारी २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेली आहे.