मुक्तपीठ टीम
आज महाराष्ट्रात कोरोनाचे ६ हजार २७० नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र, रविवारच्या वीकेंड मूडनंतरचा सोमवार हा कमी रुग्णसंख्येचा असतो, असा केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील अनुभव आहे. त्यामुळे हा सोमवार खरोखरच दिलासा देणारा आहे की वीकेंड मूडच्या साइड इफेक्टवाला आहे, ते मंगळवारपासून कळेल. राज्यातील सर्वच विभागांमधील नवी रुग्णसंख्या आज घटली. तसेच सहा जिल्ह्यांमधील नव्या रुग्णांची संख्या एकेरी झाली आहे. एक नक्की आहे, विदर्भाचा पूर्व भाग हा झपाट्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा (अपवाद बीड, उस्मानाबाद), उत्तर महाराष्ट्र हे तीन विभाग रुग्णसंख्येत उतार दाखवत आहेत. एकेरी रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांपैकी तीन जिल्हे विदर्भातील, एक मराठवाडा तर दोन उत्तर महाराष्ट्रातील आहेत.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात ६,२७० नवीन रुग्णांचे निदान.
- आज १३,७५८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५७,३३,२१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९६,६९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७९,०५१ (१५.०७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,२४,३९८ सक्रिय रुग्ण आहेत.
एकेरी रुग्णसंख्येचे सहा जिल्हे
- वर्धा २
- गोंदिया २
- परभणी २
- नंदूरबार ३
- भंडारा ५
- धुळे ५
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०२,७२७ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०१,४७३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- कोकण ००,९२० (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ००,४८८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ००२१८ (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,४४४ (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण ६ हजार २७० (कालपेक्षा ३ हजार ९१ने कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,२७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,७९,०५१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ५१८
- ठाणे ६१
- ठाणे मनपा ९१
- नवी मुंबई मनपा ७४
- कल्याण डोंबवली मनपा ८४
- उल्हासनगर मनपा १०
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ४८
- पालघर ११६
- वसईविरार मनपा ७४
- रायगड ३००
- पनवेल मनपा ९६
- ठाणे मंडळ एकूण १४७३
- नाशिक १४०
- नाशिक मनपा ४६
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर २५०
- अहमदनगर मनपा ११
- धुळे ३
- धुळे मनपा २
- जळगाव २७
- जळगाव मनपा ५
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण ४८८
- पुणे ३३९
- पुणे मनपा १४७
- पिंपरी चिंचवड मनपा १४८
- सोलापूर २०८
- सोलापूर मनपा ६
- सातारा ४३७
- पुणे मंडळ एकूण १२८५
- कोल्हापूर ६६६
- कोल्हापूर मनपा २५३
- सांगली ४५१
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७२
- सिंधुदुर्ग ४७४
- रत्नागिरी ४४६
- कोल्हापूर मंडळ एकूण २३६२
- औरंगाबाद ८९
- औरंगाबाद मनपा ३१
- जालना ३५
- हिंगोली १३
- परभणी २
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण १७१
- लातूर १०
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद ९८
- बीड १३०
- नांदेड २०
- नांदेड मनपा ११
- लातूर मंडळ एकूण २७३
- अकोला ६
- अकोला मनपा ६
- अमरावती ४८
- अमरावती मनपा ६
- यवतमाळ १९
- बुलढाणा २९
- वाशिम ३०
- अकोला मंडळ एकूण १४४
- नागपूर ११
- नागपूर मनपा २६
- वर्धा २
- भंडारा ५
- गोंदिया २
- चंद्रपूर ९
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली १३
- नागपूर एकूण ७४
एकूण ६ हजार २७०
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९४ मृत्यूंपैकी ७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २५८ ने वाढली आहे. हे २५८ मृत्यू, पुणे-११४, नाशिक-६८, नागपूर-२२, ठाणे-१८, अहमदनगर-१३, रत्नागिरी-४, सांगली-४, रायगड-३, सातारा-३, सिंधुदुर्ग-३, कोल्हापूर-२, अकोला-१, बीड-१, धुळे-१ आणि सोलापूर-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ जून २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.