मुक्तपीठ टीम
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्णमुंबईआणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत. तर त्यापैकी २५ रुग्ण त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. त्याचवेळी राज्यात कोरोनाचे ९०२ नवे रुग्ण सापडले असून, ६८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना स्थिती ठळक मुद्द्यांमध्ये
- आज राज्यात ९०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६८० रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९५,९२९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७४,४१,८०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४७,८४०(९.८६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७९,५५६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ८८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,९०३ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
- आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्णमुंबईआणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत.
- आजपर्यंत राज्यात एकूण ४०ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. (मुंबई – १४, पिंपरी चिंचवड -१०,पुणे ग्रामीण-६,पुणे मनपा -२, कल्याण डोंबिवली – २,उस्मानाबाद-२,बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१).
- यापैकी २५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या८ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत.
- या ८ रुग्णांपैकी सर्वरुग्णपुरुषआहेत
- वयोगट – २९ वर्षे ते ४५ वर्षे
- लक्षणे – ७ रुग्ण लक्षणेविरहित,१ रुग्ण सौम्य स्वरुपाचे
- प्राथमिक माहितीनुसार या पैकी पुणेयेथील ४ रुग्णांचादुबईप्रवास, आणि २ रुग्णनिकटसहवासितआहेत. मुंबईयेथील१रुग्णांचाअमेरिकाप्रवासआणिकल्याण डोंबिवलीयेथील१रुग्णांचानाजेरियाप्रवासआहे.
- या ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात आहेत.
- या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
- सर्व रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
१६६१७ | ९७८२९ | ११४४४६ | १६६१७ | २५४८ | १९१६५ | ४५ | १६ | ६१ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५२५प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४७२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२६७
- उ. महाराष्ट्र ०,०९५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०५३
- कोकण ०,००१ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१४
नवे रुग्ण ०,९०२
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४७,८४० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका २८९
- ठाणे १३
- ठाणे मनपा ४६
- नवी मुंबई मनपा ५५
- कल्याण डोंबवली मनपा १७
- उल्हासनगर मनपा ४
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ५
- पालघर ९
- वसईविरार मनपा १२
- रायगड ९
- पनवेल मनपा ११
- ठाणे मंडळ एकूण ४७२
- नाशिक १९
- नाशिक मनपा २६
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३८
- अहमदनगर मनपा ७
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ९५
- पुणे ८३
- पुणे मनपा ७४
- पिंपरी चिंचवड मनपा ५२
- सोलापूर १०
- सोलापूर मनपा ३
- सातारा ३३
- पुणे मंडळ एकूण २५५
- कोल्हापूर २
- कोल्हापूर मनपा २
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी १
- कोल्हापूर मंडळ एकूण १३
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा १६
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण २१
- लातूर ८
- लातूर मनपा ७
- उस्मानाबाद ४
- बीड ८
- नांदेड २
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण ३२
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ३
- बुलढाणा १
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ४
- नागपूर ०
- नागपूर मनपा ८
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया १
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १०
एकूण ९०२
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १७ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.