मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात आज कोरोनाचे १५ हजार ५१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर १० हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आज एक लाख ३० हजार ५४७वर पोहचली आहे. राज्यातील कोरोना सुपर हॉटस्पॉटमध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात, त्यानंतर नागपूर आणि मुंबईत आढळले आहेत. राज्यात गेल्या ४८ तासांमध्ये ४८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र ते सर्व मृत्यू आज झालेले नाहीत. नोंद झालेल्या एकूण ४८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना आकड्यांमध्ये:
- आज राज्यात १५,०५१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०,६७१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज रोजी एकूण १,३०,५४७ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,४४,७४३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ४८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.२७ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- ६,११४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण:
आज राज्यात १५,०५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,२९,४६४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई मनपा १७१३
२ ठाणे २०४
३ ठाणे मनपा ३०९
४ नवी मुंबई मनपा १५८
५ कल्याण डोंबवली मनपा २५०
६ उल्हासनगर मनपा ३४
७ भिवंडी निजामपूर मनपा १७
८ मीरा भाईंदर मनपा ७०
९ पालघर २०
१० वसईविरार मनपा ५४
११ रायगड ६५
१२ पनवेल मनपा १५३
१३ नाशिक ३३२
१४ नाशिक मनपा ६७१
१५ मालेगाव मनपा ११२
१६ अहमदनगर ३५९
१७ अहमदनगर मनपा १८९
१८ धुळे ९८
१९ धुळे मनपा २१२
२० जळगाव ४३३
२१ जळगाव मनपा २६७
२२ नंदूरबार २६६
२३ पुणे ३६३
२४ पुणे मनपा ११२२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६९८
२६ सोलापूर ८७
२७ सोलापूर मनपा ६७
२८ सातारा १४९
२९ कोल्हापूर १५
३० कोल्हापूर मनपा १५
३१ सांगली ३७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०
३३ सिंधुदुर्ग ५
३४ रत्नागिरी ५
३५ औरंगाबाद १२८
३६ औरंगाबाद मनपा ६५७
३७ जालना १७४
३८ हिंगोली ४६
३९ परभणी ४७
४० परभणी मनपा ९२
४१ लातूर ५३
४२ लातूर मनपा ८९
४३ उस्मानाबाद ७३
४४ बीड २४४
४५ नांदेड १३७
४६ नांदेड मनपा २९५
४७ अकोला ५८
४८ अकोला मनपा १५४
४९ अमरावती १४१
५० अमरावती मनपा २२७
५१ यवतमाळ २७५
५२ बुलढाणा ३४९
५३ वाशिम १८६
५४ नागपूर ३५४
५५ नागपूर मनपा २०९४
५६ वर्धा ३४५
५७ भंडारा ८१
५८ गोंदिया ४९
५९ चंद्रपूर ८५
६० चंद्रपूर मनपा ४३
६१ गडचिरोली १६
इतर राज्ये /देश ०
एकूण १५,०५१
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ४८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू वर्धा-९, ठाणे-२, नाशिक-१, औरंगाबाद-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या १५ मार्च २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)