मुक्तपीठ टीम
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ४ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी २ रुग्ण उस्मानाबाद, १ रुग्ण मुंबई येथील १रुग्ण बुलढाणा येथील आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण ३२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्यापैकी २५ रुग्ण त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. त्याचवेळी राज्यात कोरोनाचे ९२५ नवे रुग्ण सापडले असून, ९२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना स्थिती ठळक मुद्द्यांमध्ये
- आज राज्यात ९२५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९२९ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९४,६१७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७१,८२,५१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४६,०६१ (९.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७५,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ८६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,४६७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
- आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ४ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.
- यापैकी २ रुग्ण उस्मानाबाद, १ रुग्ण मुंबई येथील १रुग्ण बुलढाणा येथील आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण ३२ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णरिपोर्ट झाले आहेत. (मुंबई – १३, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२,उस्मानाबाद-२, कल्याण डोंबिवली-१ नागपूर-१, लातूर -१ वसई विरार-१ आणिबुलढाणा-१).
- यापैकी २५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या४ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत.
- या ४ रुग्णांपैकी १ स्त्री तर ३ पुरुष
- वयोगट-१६ वर्षे ते ६७ वर्षे
- लक्षणे- सर्व रुग्ण लक्षणेविरहितआहेत
- प्राथमिक माहितीनुसार उस्मनाबाद य़ेथील एकारुग्णाने शारजा प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण त्याचा निकटसहवासित आहे.
- बुलढाणाय़ेथील रुग्णानेदुबई प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्तीनेआयर्लंडप्रवास केला आहे.
- या पैकी ३ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एक रुग्णलसीकरणास पात्र नाही
- सर्व रुग्ण रुग्णालयात विलगीकरणात आहेत.
- या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
१४५२२ | ८३६०२ | ९८१२४ | १४५२२ | २२६८ | १६७९० | ३० | ९ | ३९ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४४७प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ३२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,४१७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,३२४
- उ. महाराष्ट्र ०,१२३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०३७
- कोकण ०,००७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१७
नवे रुग्ण ०,९२५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ९२५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४६,०६१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका २३५
- ठाणे १२
- ठाणे मनपा ३०
- नवी मुंबई मनपा ४५
- कल्याण डोंबवली मनपा २६
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा १०
- पालघर २
- वसईविरार मनपा २०
- रायगड १३
- पनवेल मनपा २०
- ठाणे मंडळ एकूण ४१७
- नाशिक ३४
- नाशिक मनपा ४०
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३५
- अहमदनगर मनपा ८
- धुळे १
- धुळे मनपा १
- जळगाव २
- जळगाव मनपा १
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण १२३
- पुणे ७३
- पुणे मनपा ११८
- पिंपरी चिंचवड मनपा ४४
- सोलापूर २२
- सोलापूर मनपा २
- सातारा ३८
- पुणे मंडळ एकूण २९७
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा ९
- सांगली ५
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी ६
- कोल्हापूर मंडळ एकूण ३४
- औरंगाबाद ४
- औरंगाबाद मनपा ६
- जालना ३
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण १५
- लातूर ३
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ५
- बीड ७
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण २२
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ४
- यवतमाळ २
- बुलढाणा २
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ९
- नागपूर ०
- नागपूर मनपा ३
- वर्धा १
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ८
एकूण ९२५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १५ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.