मुक्तपीठ टीम
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेहून ५ डिसेंबर २०२१ रोजी आलेला नागपूर येथील एक ४० वर्षीय पुरुष ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण १८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्यापैकी ९ रुग्ण त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. त्याचवेळी राज्यात कोरोनाचे ७०४ नवे रुग्ण सापडले असून, ६९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना रुग्ण माहिती ठळक मुद्दे
- आज राज्यात ७०४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६९९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९२,५०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६८,७५,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४३,८८३ (९.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७५,३१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यातील ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती
- आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेहून ५ डिसेंबर २०२१ रोजी आलेला नागपूर येथील एक ४० वर्षीय पुरुष ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण १८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. ( मुंबई – ५, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -१ कल्याण डोंबिवली – १ आणि नागपूर -१).
- यापैकी ९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णाची माहिती –
- लक्षणे – सौम्य
- सध्या एम्स नागपूर येथे विलगीकरणात
- या रुग्णाच्या ३० निकटसहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आहेत.
- पुनर्संसर्ग – ( रि – इन्फेक्शन ) – हा रुग्ण यापूर्वी ११ एप्रिल २१ रोजी देखील कोविड बाधित आढळला होता तेव्हा देखील त्याची लक्षणे सौम्य होती आणि रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नव्हती.
- या रुग्णाने कोणतीही लस घेतलेली नाही.
- दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
११७५१ | ६५७७९ | ७७५३० | ११७५१ | १५२९ | १३२८० | २२ | ८ | ३० |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,४४१ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३३५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२२४
- उ. महाराष्ट्र ०,०९१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०३२
- कोकण ०,००४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१८
नवे रुग्ण ०,७०४
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ७०४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४३,८८३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १८८
- ठाणे १०
- ठाणे मनपा ३७
- नवी मुंबई मनपा २९
- कल्याण डोंबवली मनपा १२
- उल्हासनगर मनपा १
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ७
- पालघर ४
- वसईविरार मनपा १८
- रायगड १३
- पनवेल मनपा १५
- ठाणे मंडळ एकूण ३३५
- नाशिक २५
- नाशिक मनपा १४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४३
- अहमदनगर मनपा ४
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ९१
- पुणे ६५
- पुणे मनपा ९६
- पिंपरी चिंचवड मनपा ३६
- सोलापूर ८
- सोलापूर मनपा ३
- सातारा ८
- पुणे मंडळ एकूण २१६
- कोल्हापूर ०
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली १
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४
- सिंधुदुर्ग २
- रत्नागिरी २
- कोल्हापूर मंडळ एकूण १२
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ५
- जालना २
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १२
- लातूर २
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद ८
- बीड ८
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण २०
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ५
- यवतमाळ १
- बुलढाणा २
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ८
- नागपूर १
- नागपूर मनपा ३
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १०
एकूण ७०४
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १२ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.