मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईतील आणखी २ जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता १० झाली आहे.
- जोहांसबर्ग ( दक्षिण आफ्रिका) हून दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे सिध्द झाले आहे.
- या रुग्णासोबत राहिलेल्या आणि २५ नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या ३६ वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.
- या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत.
- या दोन्ही रुग्णानी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
- या दोन्ही रुग्णांच्या ५ अंतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग ठळक माहिती
- आज राज्यात ५१८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८११ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८७,५९३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६१,५६,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३९,२९६ (१०.०४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७८,८०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ८९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,८५३ सक्रीय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,२९८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,११०
- उ. महाराष्ट्र ०,०६० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०३२
- कोकण ०,००० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१८
नवे रुग्ण ०,५१८
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३९,२९६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १६३
- ठाणे ११
- ठाणे मनपा ३१
- नवी मुंबई मनपा २७
- कल्याण डोंबवली मनपा १६
- उल्हासनगर मनपा ०
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ९
- पालघर ०
- वसईविरार मनपा २१
- रायगड ११
- पनवेल मनपा ९
- ठाणे मंडळ एकूण २९८
- नाशिक ४
- नाशिक मनपा १६
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर २७
- अहमदनगर मनपा ११
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६०
- पुणे ३०
- पुणे मनपा ३९
- पिंपरी चिंचवड मनपा १५
- सोलापूर ८
- सोलापूर मनपा ०
- सातारा ९
- पुणे मंडळ एकूण १०१
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा २
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ०
- कोल्हापूर मंडळ एकूण ९
- औरंगाबाद १०
- औरंगाबाद मनपा ४
- जालना ८
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ३
- औरंगाबाद मंडळ एकूण २५
- लातूर ०
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद १
- बीड ५
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ७
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ५
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ६
- नागपूर ४
- नागपूर मनपा ७
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १२
एकूण ५१८
(नोट: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०६ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.