मुक्तपीठ टीम
कोरोना संसर्गाचा वेग लक्षात घेत अखेर महाराष्ट्र सरकारनं निर्बंध अधिक कडक केले आहेत. मात्र, लॉकडाऊन करण्यात आलेले नाही. रविवार, १० जानेवारीपासून रात्री अकरापासून सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी रात्री ११ नंतर बाहेर पडू नये. तसेच दिवसा पाचपेक्षा जास्त लोकांनी जमण्यास प्रतिबंध करणारी जमावबंदी असणार आहे.
लसीकरण पावलं, ऑक्सिजनवाल्या रुग्णांचं प्रमाण घटलं!
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वेगानं वाढत असल्यानं राज्य सरकार कडक पावलं उचलण्याची अपेक्षा होती. मात्र, यावेळी लसीकरण बऱ्यापैकी झाल्यामुळे कोरोना संसर्ग होणाऱ्यांमधील फक्त लस न घेतलेल्यांनाच ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. इतरांपैकी बहुतेक नव्या रुग्णांचं सौम्य लक्षणांमुळे गृह विलगीकरणारच भागत आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनऐवजी निर्बंध कडक करण्याचा उपाय करण्यात आला आहे.
मुंबईकरांची लाइफलाइन सुरुच राहणार!
- दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असणार आहे.
- शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, थिएटर्स, सलून, सरकारी तसेच खासगी कार्यालये या आस्थापनांसाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे.
- मुंबईतील नोकरदारांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे मुंबईची लाइफलाइन लोकल ट्रेन सेवा सुरुच राहणार आहे.
- सध्याच्या लसीकरणाशिवाय अन्य कोणतेही नवे निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
निर्बंध कधी, कुठे, कसे, कुणासाठी?
सामान्य नागरिक
- राज्यात सकाळी ५ पासून रात्री ११पर्यंत पाच पेक्षा जास्त लोकाना एकत्र जमता येणार नाही. त्यासाठी जमावबंदी आदेश आहे.
- रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू असल्याने बाहेर फिरता येणार नाही.
सरकारी कार्यालयं
- सरकारी कार्यालयांमध्ये लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय लोकांना प्रवेश नाही.
- व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद
- एकाच आवारातील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद
- कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा कार्यालयाच्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात बदल
- सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचे तंतोतंत पालन आवश्यक.
- प्रत्येक आस्थापनेत थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर आवश्यक
खासगी कार्यालयं
- खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची मर्यादा
- कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश
- लस घेतले नसलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक
- कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याची काळजी घ्यावी
- थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे
रोजीरोटी बंद करायची नाही. पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी नको – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेhttps://t.co/4vyzmnizc1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 8, 2022
लग्न
- लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
अंत्यविधी
- अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
राजकीय-सामाजिक कार्यक्रम
- सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
शैक्षणिक
- शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.
- केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचा अपवाद असेल.
- इतर सरकारी शैक्षणिक विभागांच्या कार्यक्रमांना अपवादात्मक स्थितीत परवानगी.
सलून सुरु, ब्युटीपार्लर, जिम, स्विमिंग पूल
- सलून दिवसा ५० टक्के क्षमतेने चालू राहतील.
- कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार.
- रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवावे लागतील.
- जलतरण तलाव, जिम्नॅशियम, ब्युटीपार्लर मात्र बंद राहणार.
खेळ
- स्थानिक खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार.
- केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी.
फिरण्याची ठिकाणे
- प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
मॉल-बाजार
- शॉपिंग मॉल आणि सर्व बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इतरवेळी ५० टक्के क्षमतेसह परवानगी.
- अशा ठिकाणी क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार.
- अशा सर्व ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश असणार.
रेस्टॉरंट आणि भोजनालये
- ५० टक्के क्षमतेनं सुरु असणार, पण रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार.
- त्यांची क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार.
- लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश असणार.
- होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.
नाट्यगृह आणि सिनेमागृह
- ५० टक्के क्षमतेनं सुरु असणार
- रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार.
- त्यांची क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार.
- लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश असणार.
आंतरराष्ट्रीय प्रवास
- केंद्र सरकारच्या नियमांनुसार धोरण असणार.
राज्यांतर्गत सर्व प्रकारचा प्रवास
- ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.
हेही वाचा:
राज्यात ४१ हजार ४३४, मुंबईत २० हजार ३१८, तर पुण्यात ४ हजार ३९० नवे रुग्ण!