Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीएसटी संकलनात पुन्हा महाराष्ट्र अव्वल! २७ हजार ४९५ कोटींचा महसूल!! २५ टक्के वाढ!!!

May 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
maharashtra collects highest gst in india

मुक्तपीठ टीम

एप्रिल २०२२ मध्ये देशात उच्चांकी जीएसटी महसूल संकलन झाला आहे. देशातील या विक्रमी जीएसटी संकलनात सर्वाधिक योगदान महाराष्ट्राने दिले आहे. महाराष्ट्राने २७ हजार ४९५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला आहे.

सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी ३३ हजार १५९ कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ४१ हजार ७९३ कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी ८१ हजार ९३९ कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. ३६ हजार ७०५ कोटींसह) आणि उपकर १० हजार ६४९ कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या रु. ८५७ कोटींसह).यांचा समावेश आहे.

एप्रिल २०२२ मध्‍ये झालेले सकल जीएसटी संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन आहे. त्या आधीच्या महिन्यात नोंदवण्यात आलेल्या १,४२,०९५ कोटी रुपये जीएसटी संकलनाच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन २५ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.

सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला ३३ हजार ४२३ कोटी रुपये आणि सीजीएसटीला २६९६२ कोटी रुपये चुकते केले आहेत.

नियमित समझोत्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ६६,५८२ कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी ६८,७५५ कोटी रुपये आहे.

एप्रिल २०२२ चा जीएसटी महसूल हा मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा २०% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल ३०% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १७% अधिक आहे.

सकल जीएसटी संकलनाने प्रथमच १.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.मार्च २०२२ मध्ये निर्माण एकूण ई-वे देयकांची संख्या ७.७ कोटी होती, जी फेब्रुवारी २०२२ मध्ये निर्माण झालेल्या ६.८ कोटी ई-वे देयकांपेक्षा १३% ने अधिक आहे,ही वाढ व्यावसायिक व्यवहार वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे प्रतिबिंबित करते.

एप्रिल २०२१ मध्ये दाखल केलेल्या एकूण ९२ लाख विवरणपत्रांच्या तुलनेत. एप्रिल २०२२ मध्ये, जीएसटीआर -३बी मध्ये १.०६ कोटी जीएसटी विवरणपत्र भरण्यात आली त्यापैकी ९७ लाख विवरणपत्र मार्च २०२२ या महिन्याशी संबंधित आहेत.

एप्रिल २०२१ च्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये प्रत्येक राज्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलाची राज्यनिहाय आकडेवारी खालील तक्त्यांमध्ये दिली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001VMEG.png

 

State-wise growth of GST Revenues during April 2022

State Apr-21 Apr-22 Growth
Jammu and Kashmir 509 560 10%
Himachal Pradesh 764 817 7%
Punjab 1,924 1,994 4%
Chandigarh 203 249 22%
Uttarakhand 1,422 1,887 33%
Haryana 6,658 8,197 23%
Delhi 5,053 5,871 16%
Rajasthan 3,820 4,547 19%
Uttar Pradesh 7,355 8,534 16%
Bihar 1,508 1,471 -2%
Sikkim 258 264 2%
Arunachal Pradesh 103 196 90%
Nagaland 52 68 32%
Manipur 103 69 -33%
Mizoram 57 46 -19%
Tripura 110 107 -3%
Meghalaya 206 227 10%
Assam 1,151 1,313 14%
West Bengal 5,236 5,644 8%
Jharkhand 2,956 3,100 5%
Odisha 3,849 4,910 28%
Chattisgarh 2,673 2,977 11%
Madhya Pradesh 3,050 3,339 9%
Gujarat 9,632 11,264 17%
Daman and Diu 1 0 -78%
Dadra and Nagar Haveli 292 381 30%
Maharashtra 22,013 27,495 25%
Karnataka 9,955 11,820 19%
Goa 401 470 17%
Lakshadweep 4 3 -18%
Kerala 2,466 2,689 9%
Tamil Nadu 8,849 9,724 10%
Puducherry 169 206 21%
Andaman and Nicobar Islands 61 87 44%
Telangana 4,262 4,955 16%
Andhra Pradesh 3,345 4,067 22%
Ladakh 31 47 53%
Other Territory 159 216 36%
Center Jurisdiction 142 167 17%
Grand Total 1,10,804 1,29,978 17%

Tags: GSTIndiaMaharashtraजीएसटीभारतमहाराष्ट्रवस्तू आणि सेवा कर
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE आपल्याला जगवणाऱ्या शेतकऱ्याचं जीवन सुसह्य करणं हेच आपल्या सरकारचं काम! – उद्धव ठाकरे

Next Post

सर्वोच्च न्यायालयाकडून कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांची गंभीर दखल, नालसाकडून मागवली माहिती

Next Post
sc

सर्वोच्च न्यायालयाकडून कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांची गंभीर दखल, नालसाकडून मागवली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!