मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ बैठक झाली. अद्याप इतर मंत्र्यांची निवड आणि शपथविधी झाला नसल्याने दोघांच्याच उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील करात तीन रुपये कपात करण्याच्या निर्णयासह आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठक : गुरूवार, दि. १४ जुलै २०२२
एकूण निर्णय- ८
वित्त विभाग
पेट्रोल करात पाच, तर डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात
राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर कपातीचा निर्णय आज ( १४ जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला ६ हजार कोटी रुपयांच्या करातून दिलासा मिळेल.