Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला पर्यावरण संवधर्नासाठी मानाचा पुरस्कार!

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल

November 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, निसर्ग
0
Glasgo

मुक्तपीठ टीम 

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल घेतली गेली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) साठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Glasgo            

महाराष्ट्राला अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनकडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनतर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या हवामान भागीदारी आणि क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्सची ही येथे विशेष दखल घेतली गेली. शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याचेही पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांनी नमूद केले आहे.            

 

आदित्य ठाकरे म्हणाले, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टीकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच ‘माय प्लॅनेट’ ही चळवळ सुरू केली आहे. त्याचबरोबर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित करत आहोत. राज्य सरकार पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ ऊर्जेचा विचार करीत आहे. नुकतेच एका महामार्गाचे सोलराइजेशन केले असून २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

            

 

आदित्य ठाकरे म्हणाले, भूगोल, वंशाच्या सीमा, राष्ट्रीयत्व किंवा लिंगभेद नसलेल्या या जागतिक समस्येवर काम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि विधायक व अर्थपूर्ण कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवामान कृतीसाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व योगदानाबद्दल अंडर२ कोईलेशनद्वारे मान्यता मिळाली याचा आम्हाला खरोखरच आनंद होत आहे.

            

 

हवामान कृतीसाठी वचनबद्ध असलेल्या सर्वात मोठ्या जागतिक नेटवर्क अंडर२ कोईलेशनतर्फे उपराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली आहे. तर, क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्ससाठी ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा) यांनी आणि हवामान भागीदारीसाठी क्‍वेबेक (कॅनडा) यांनी इतर दोन पुरस्कार जिंकले. महाराष्ट्राने अंडर २ च्या तीनही श्रेणींसाठी प्रवेशिका दिल्या होत्या.

            

 

संयुक्त राष्ट्रांच्या ‘रेस टू झिरो’  उपक्रमामध्ये तसेच जागतिक स्तरावर हवामान बदलाबाबत संबोधित करण्यासाठी सी-४० शहरांच्या उपक्रमात देखील महाराष्ट्र सामील झाले आहे.


Tags: Aaditya thackreyCreative Climate SolutionsEnvironmentMaharashtraRace to ZeroScotlandUnder 2 coailationअंडर२ कोईलेशनआदित्य ठाकरेक्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्सपर्यावरणमहाराष्ट्ररेस टू झिरोस्कॉटलंड
Previous Post

आक्रमक मलिकांना रोखण्यासाठी कायद्याचा आधार, १०० कोटींचा खटला, आता अॅट्रोसिटीची तक्रार!

Next Post

परमबीर खंडणी प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक, वसुलीचे पुरावे मिळणार?

Next Post
parambir singh

परमबीर खंडणी प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक, वसुलीचे पुरावे मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!