मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या सुमारे १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू केली. तपास यंत्रणांनी महाराष्ट्रातून २० हून अधिकजणांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये छापेमारी-
- मुंबई
- नवी मुंबई
- ठाणे
- पुणे
- नाशिक
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नांदेड
- परभणी
राज्यात तपास यंत्रणांची धडक कारवाई…
- एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
- पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.
- पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत.
- या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
- एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर २३ मधील पीएफआयच्या कार्यालयावर छापा मारला.
- त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
- औरंगाबादमधून एटीएसने पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.
- नांदेड मधून पाच जणांना अटक केली आहे.
या कलमांतर्गत राज्यात गुन्हे दाखल…
- मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये अंतर्गत गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत.
- समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.