मुक्तपीठ टीम
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस पुन्हा वाढतच चालला आहे. आपल्यासाठी चिंतेची बाब अशी की सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची वाढती संख्या केंद्रासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ८ महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थितीवर केंद्रीय यंत्रणाही गंभीरतने लक्ष ठेवत आहेत.
देशातील दहा कोरोना सुपर हॉटस्पॉटमध्ये पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद हे महाराष्ट्रातील आठ या आठ जिल्ह्यांमध्ये देशातील सर्वात जास्त कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण असलेले १० जिल्हे
• पुणे – १८,४७४
• नागपूर – १२,७२४
• ठाणे – १०,४६०
• मुंबई – ९,९७३
• बंगळुरू – ५,५२६
• एर्नाकुलम – ५,४३०
• अमरावती – ५,२५९
• जळगाव – ५,०२९
• नाशिक – ४,५२५
• औरंगाबाद – ४,३५४
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पंरतु, रुग्णांची संख्या आणखी वाढत राहिली तर जिथे गरजेचा वाटेल त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
‘कदाचित काही ठिकाणी लॉकडाउन लागू करावा लागणार आहे. म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की, लसीकरण करून घ्या, अनावश्यक गर्दी करू नका, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करा, जर कुठे नियमांचे पालन केले जात नसेल तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार आहे, एक दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहोत, त्यानंतर लॉकडाउनचा कडक निर्णय घ्यावा लागणार आहे’, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.