Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्रात दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच! जाणून घ्या सर्व काही…

March 20, 2021
in featured, करिअर
0
exam

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात यंदा दहावी – बारावीच्या परीक्षा नेहमीसारख्याच लेखी म्हणजे ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी घोषणा केली आहे. या परीक्षा ठरलेल्या तारखांनुसारच होणार आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन परीक्षांच्या वेळेत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

 

दहावी-बारावी परीक्षांविषयी महत्वाची माहिती:

  • राज्य मंडळांच्या दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन म्हणजे लेखी होणार
  • लेखी परीक्षा विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच होणार
  • वर्गखोल्या कमी पडल्या जवळच्या शाळेत बैठक व्यवस्था केली जाणार
  • ८०  गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येईल
  • ४० आणि ५० गुणांच्या परीक्षांसाठी १५ मिनिटे जास्त वेळ असेल
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला २० मिनिटे जास्त वेळ दिला जाईल
  • प्रॅक्टिकल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने पार पाडली जाईल
  • हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत.
  • विद्यार्थी परीक्षा काळात कोरोनाबाधित असल्यास त्यासाठी विशेष परीक्षा घेतली जाईल
  • अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येईल

 

परीक्षा माहिती विस्ताराने:

इ. 10 वी व 12 वी च्या परीक्षा लेखी परीक्षा

• इ. 10 वी ची लेखी परीक्षा 29/04/2021 ते 20/05/2021 या कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे.
• इ. 12 वी ची परीक्षा दि.23/04/2021 ते 21/05/2021 कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने लेखी परीक्षा होईल.

 

परीक्षा केंद्रे
• कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल.

 

परीक्षेची वेळ
• दरवर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जात असे. परंतु यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 40 व 50 गुणांच्या परिक्षेसाठी 15 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.
• परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घडयाळी तासा साठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

 

प्रात्यक्षिक परीक्षा
• इ. 10 वी च्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड-19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील.
• प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत सादर करण्यात यावेत.
• इ. 12 वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. 22/05/2021 ते 10/06/2021 या कालावधीत होतील.
• कोविड -19 च्या परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वी च्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.
• कला/वाणिज्य/ व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15 दिवसात Assignment सादर करावेत.
• इ.10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल.

 

विशेष परीक्षेचे आयोजन

• एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

 

पुरवणी परीक्षा

• परीक्षा मंडळा मार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

 

सुरक्षात्मक उपाय योजना

• परीक्षेसंदर्भात शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील
• कोविड-19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्र निर्गमित करण्यात येतील
• सर्व विद्यार्थ्यांना / पालकांना आवाहन करण्यात येते की राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी.
• इ.10 वी व 12 वी परीक्षेसाठी नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लस देण्याचा विचार शिक्षण विभाग करीत आहे.

 

Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnj pic.twitter.com/BX0873EFVM

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021

१०वी, १२वी च्या परीक्षांचे वेळापत्रक

  • १० वी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत होणार
  • १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.

 

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६ फेब्रुवारी २०२१ पासून वेळापत्रक उपलब्ध आहे.

 

 


Tags: hsc examMaharashtrassc exam
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

मिशन २०२४साठी दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह

Next Post
Dattatreya-Hosabale-RSS

मिशन २०२४साठी दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!