मुक्तपीठ टीम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी येथील चैत्यभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून त्यांचे अनुयायी दर्शनासाठी येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर व शिवाजी पार्क परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्या अनुशंगाने वाहतूकीचे नियोजन करण्यात आले असून त्याबाबात अडचणी आल्यास वाहतूक नियंत्रण कक्षाच्या ८४५४९९९९९९ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) वाहतूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. बदल करण्यात आलेले वाहतूक मार्ग, पर्यायी मार्ग तसेच पार्किंगची व्यवस्था पुढीलप्रमाणे.
एक दिशा मार्ग/वाहतुकीसाठी रस्ते बंद
- एस. के. बोले रोड – हा रस्ता सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हनुमान मंदिरापर्यंत एक दिशा मार्ग राहील म्हणजेच हनुमान मंदिरकडून एस. के. बोले रोडवर प्रवेश बंद राहील.
- भवानीशंकर रोड – हा रस्ता कबुतरखान्यापासून गोखले रोड दक्षिण जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहील म्हणजेच गोखले रोड, दक्षिण, गोपीनाथ चव्हाण चौक येथून भवानी शंकर मार्गावर बेस्ट बसेस व अत्यावश्यक सेवा असलेली वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहिल.
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग :- हा मार्ग सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यत वाहतुकीकरीता बंद राहिल. तथापी स्थानिक रहिवाशांची वाहने हिंदूजा हॉस्पिटलकडून शिवाजी पार्क रोड नं. 5 म्हणजे पांडूरंग नाईक मार्ग जंक्शनपर्यत जाऊ शकतील.
- रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस. व्ही. एस. रोड जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल.
- आवश्यकता भासल्यास दादर टी.टी. कडून कोतवाल गार्डनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टिळक ब्रिजवर बेस्ट बसेस व अत्यावश्यक सेवा असलेली वाहने वगळून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल.
- सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने, बेस्ट बसेस वगळून माहिम जंक्शन येथून मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावर वळविण्यात येतील.
वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्गाबाबत सूचना
दक्षिण वाहीनी पश्चिम दु्रतगती मार्गे बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास
- कलानगर जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक किंवा ६० फुट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रूग्णालय येथे उजवे वळण घेता येईल अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपुलमार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.
उत्तर वाहीनी कुलाबा तसेच सीएसटी मार्गे उत्तर वाहीनी वरून जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास
- पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे.
उत्तर वाहीनी महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून उत्तर वाहीनी वरून जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास
- डॉ. ई. मोजेस रोड, रखांग चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.
पूर्व दृतगती महामार्ग:-
- पूर्व दृतगती महामार्गाने दक्षिणेकडे जाणारी वाहतूकीबाबत वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बीपीटी कॉलनी, पुर्व मुक्त दृतगती मार्गाचा वापर करावा.
‘नो पार्किंग’ झोन
चैत्यभुमीकडे जाणाऱ्या शिवाजीपार्क परिसरातील एस. व्ही. एस. रोड, रानडे रोड, एन. सी. केळकर रोड, केळूस्कर रोड (दक्षिण),केळुस्कर (उत्तर), गोखले रोड (दक्षिण व उत्तर), टिळक ब्रीज, भवानी शंकर रोड, एस. के. बोले मार्ग, लखमषी नप्पू रोड, माटुंगा हे रस्ते हे दि.०४/१२/२०२१ रोजी २१.०० वा. ते दि.०७/१२/२०२१ चे २४.00 वा. पर्यत ‘नो पार्किंग’ झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
वाहने पार्किंग करिता उपलब्ध ठिकाणे
पश्चिम द्रुतगती मार्गे
- दादर येथील सेनापती बापट मार्ग मोरी रोड ते झारापकर मार्ग,
- कामगार मैदान सेनापती बापट मार्ग,
- कोहिनुर स्क्वेअर मिल कंम्पा व माहिम रेती बंदर.
ठाणे व नवी मुंबईकडून पूर्व द्रुतगती मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी
- इंडिया बुल फायनान्स सेटर,
- लोढा कमला मिल रोड,
- एडनवाला रोड, फिरदोस रोड,फाईव्ह गार्डन परिसर.
एल.बी.एस. रोडसाठी
- इंडिया बुल फायनान्स सेंटर,
- लोढा कमला मिल रोड,
- एडनवाला रोड, फिरदोस रोड, फाईव्ह गार्डन परिसर.
वाशी ब्रिज- जिजाबाई भोसले मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी
इंडिया बुल सेंटर व आर.ए.के.चार रोड. दरम्यान वाहतूकीच्या या बदलासंबंधीत कोणतीही अडचण असल्यास वाहतूक नियंत्रण कक्ष येथे कार्यान्वीत असलेल्या ८४५४९९९९९९ या हेल्पलाईन संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) वाहतूक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.