मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हिजेएनटी) सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी मदन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंजारा व भटक्या-विमुक्त समाजातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित एका कार्यक्रमामधे मदन जाधव यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजीव शुक्ला, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, उपाध्यक्ष संजय राठोड, मोहन जोशी, हुसेन दलवाई, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सचिव संजय झाडे पाटील, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष झिया उल रहेमान, डॉ. गजानन देसाई, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मिलींद खराडे, देवानंद पवार, मधु चव्हाण, प्रमोद मोरे, शाह आलम शेख, ठाणे जिल्हाध्यक्ष राकेश पाटील, काँग्रेस नेते मोईन काझी, भारत राठोड, राजाराम पवार, लक्ष्मण म्हस्के, डॉ. प्रियंका राठोड, आदी उपस्थित होते.
मदन जाधव हे गेल्या १०-१५ वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. कल्याण येथील तिज महोत्सव कृती समितीचे ते अध्यक्ष असून या समितीच्या वतीने ते कल्याण व मुंबई परिसरासह सर्व बंजारा व भटक्या-विमुक्त समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मदन जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्या पुढील कार्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.