शुभम दिपक कातुर्डे
अर्थशास्त्र विषयात M.A. केले असून, सध्या एका फायनान्स कंपनी मध्ये कार्यरत आहे.
मन अधीन-अधीर…
मन अधीन-अधीर,
स्वप्नी सावल्यांचा खेळ,
अल्लड भावनांचे थवे,
नभी तुझाच वावर…
नक्षी आठवांची स्मरे,
वाळूमध्ये फुललेली,
अन क्षणात विरहाची,
लाट त्यावर अंथरलेली…
मी बावळा चकोर,
तू चांद पौर्णिमेचा,
कळा सोळा सरता,
क्षण आला हा भेटीचा…
मनी बहरे मल्हार,
मैफीलं रंगवून,
सूर उमटती आनंदे,
राग तुझाच गाऊन…!!