मुक्तपीठ टीम
अलिकडच्या काही महिन्यांत महागाई दरात लक्षणीय वाढ होत आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, आजपासून १४ किलोगॅमच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. यावेळेस प्रति सिलिंडरवर २५ रुपये वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रति सिलिंडरसाठी दिल्लीत ७१९ रुपये, कोलकत्त्यात ७४५.५० रुपये, मुंबईत ७१९ रुपये आणि चेन्नईत ७३५ रुपये द्यावे लागत आहेत.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतीत बदल होतात. १ जानेवारीला प्रति सिलिंडरसाठी दिल्लीत ६९४ रुपये, कोलकत्त्यात ७२० रुपये, मुंबईत ६९४ रुपये आणि चेन्नईत ७१० रुपये द्यावे लागत होते. मात्र, यात आता वाढ झाली आहे. तसेच १ फेब्रुवारी रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १९० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर, घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. पण आज घरगुती सिलिंडरच्या दरात सहा रुपयांनी वाढ झाली आहे.
डिसेंबर २०२० मध्ये तेल कंपन्यांनी एलपीजीच्या किंमती दोनदा वाढ केली होती.