मुक्तपीठ टीम
तीन महिन्यानंतर घरगुती गॅस सिलिंडर भाव या महिन्यात २५.५० रुपयांनी वाढले आहे. एप्रिल ते जून पर्यंत ८०९ रुपयांवर विना सबसिडी घरगुती गॅस सिलिंडर टिकून होता,परंतु १ जुलै पासून हा आता ८३४.५० रुपयांमध्ये मिळेल.जर या वर्षाचं बघितलं गेले तर जानेवारी पासून ते आतापर्यंत १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडर १४०.५० रुपये इतका महाग झाला आहे. १ जानेवारीला याचा दर ६९४ रुपये होता.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर तीन वेळा वाढले आहेत. पहिल्यांदा ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपये आणि मग १४ फेब्रुवारीला ५० रुपये आणि नंतर २५ फेब्रुवारी रोजी तिसऱ्यांदा २५ रुपये मग परत १ मार्चला २५ रुपयांची वाढ झाली. यादरम्यान पश्चिम बंगालच्या निवडणुकी वेळेस १ एप्रिलला प्रति सिलिंडर १० रुपये कमी केले गेले. आता जुलैमध्ये परत २५ रुपयांची वाढ झाली आहे.
गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ-
- सरकारी कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत.
- यावेळी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
- कालपासून मुंबईत १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८३४ रुपये ५० पैसे झाली आहे.
- कालपर्यंत मुंबईत १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये होती.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, सर्व सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती कमी कराव्यात, वाढवायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतात. यापूर्वी एक मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली होती. तेल कंपन्यांनी एप्रिलमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीत दहा रुपयांची कपात केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घरगुती सिलिंडर महाग झाले.