मुक्तपीठ टीम
लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम चार दिवसांत करून जागतिक विक्रम करण्याचा निर्धार राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. केला आहे. त्यानुसार कंपनीचं कामही सुरु आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या महमार्गाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात येणार आहे.
अमरावती अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजुच्या दोन लेनमधील ७५ किमी पर्यंतचे चौपदरीकरणाचे काम शुक्रवार ३ जूनपासून सुरु झाले. ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम ७ जून दरम्यान न थांबता करण्यात येणार आहे. ७ जूनपर्यंत सलग काँक्रिटीकरणाचे काम करून ७० ते ८० किलोमीटर लांबीचे काम करण्याचा कंत्राटदारांचा मानस आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये होईल.
या प्रकल्पासाठी राजपथ इन्फ्राकॉनकडून काटेकोर नियोजन…
- राजपथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे.
- तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडियाद्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल.
- त्यासाठी ७२८ मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे.
- कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणी देखील करण्यात येणार आहे.
- जागतिक विक्रमासाठी अभूतपूर्व तयारी या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राज पथ टीमने सूक्ष्म नियोजन केले आहे.
- प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.
- यात प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्वॉलिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर आणि अन्य कर्मचारी यांची चमू तैनात करण्यात आली आहे.
- या महामार्गावरच, माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे.
- यात चार हॉट मिक्सप्लांट, चार व्हीललोडर, एक पेव्हर, एक मोबाईल फिडर, सहा टँडेम रोलर, १०६ हायवा, दोन न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह 728 मनुष्यबळ कार्यरत असतील.
- यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी टाटा मोटर्सचे पाच इंजिनिअर आणि अन्य पाच अधिकारी येथे तैनात आहेत.
- ही चमू त्या यंत्रांवर सतत लक्ष ठेवून आहे.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, रस्ता निर्मितीचा हा विक्रम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
याआधी सांगली-साताऱ्यात राजपथचाच विश्वविक्रम!
- राज पथ इन्फ्राकॉनने सांगली-सातारा दरम्यान पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान सतत २४ तास रस्ता तयार करीत विश्वविक्रम स्थापित केला होता.
- सार्वजनिक कार्य प्राधिकरण-अश्गुल यांनी दोहा कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. यात त्यांनी १० दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता.
- राजपथ इन्फ्राकॉनने आता तो विक्रम मोडण्याचा चंग बांधला आहे.
- लोणी-मूर्तीजापूर दरम्यान विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाल्यास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल.
भारतातील नामांकित कंपन्यांपैकी एक राजपथ इन्फ्राकॉन!!
- राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी भारतातील नामांकित आणि विश्वासार्ह पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये प्रशंसित आणि मान्यताप्राप्त अशी कंपनी आहे.
- आधुनिक बांधकाम यंत्रांच्या सेट-अपच्या सर्व आवश्यक श्रेणींनी सुसज्ज आहे.
- राज पथ इन्फ्राकॉन टीममध्ये अनुभवी अभियंते आणि मशीन ऑपरेटर यांच्या कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाचा समावेश आहे.
- तसेच उद्योगक्षेत्रातील सर्वात योग्य अशा एकसंघ तज्ज्ञांचा उत्साही व्यवस्थापकीय टास्कफोर्स आहे.
- या बळासह राज पथ इन्फ्राकॉनने भारतीय पायाभूत उद्योगात नवीन मानदंड स्थापित केले आहेत.
- पायाभूत सुविधांच्या विकासात विशेष, राजपथ इन्फ्राकॉनने आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते, पूल, कालवे, बॅरेजेस आणि धरणांपर्यंतचे विविध प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
- राज पथ इन्फ्राकॉनने आठ एचएएम प्रकल्पांतर्गत बिटुमिनस काँक्रीटस तथा लवचिक फुटपाथसह ४५० किलोमीटरचे राज्य महामार्ग रस्ते आणि पीक्यूसी कठोर फुटपाथ रस्त्यांचे १०० किलोमीटर सिमेंटचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.