मुक्तपीठ टीम
बोरिवलीतील मुंबई मनपाचा वॉर्ड क्रमांक १०. या वॉर्डात झोपडपट्टी भाग मोठा. कोरोना संकटात या वॉर्डातील सामान्यांसोबत कायम राहिलेल्या भास्कर खुरसंगे, नगरसेविका रिद्धी खुरसंगे आणि शाखाप्रमुख सुबोध दत्ताराम माने यांच्याबद्दल मुक्तपीठचे त्यांच्या विभागातील वाचक, दर्शक राजेश घोणे यांनी कळवले आहे.
तौक्ते चक्रीवादळा बोरिवलीतील डोंगराळ परिसरातही फटका बसला. पण या त्रिकुटाने लोकांना दिलासा दिला. तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत. आणि तसं केलंही, वादळी पावसामुळे आपल्या काजुपाडा – सावरपाडा – गणेश चोक – हनुमान टेकडी – समर्थ मित्र मंडळ – दौलत नगर येथील काही घरांचे खूप नुकसान झाले. ज्या घरांचे पत्रे उडाले आहेत किंवा झाडे कोसळल्याने पत्रे तुटले आहेत. त्यांना भास्कर खुरसंगे यांनी स्व:खर्चाने पत्रे घरपोच केले. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे वचनही दिले.
गेल्या मार्चपासून भारतात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु झाला. अनेकांचे रोजगार गेले. व्यापार उदयोग बंद झाले. माणसाच्या स्वभावाच्या विविध छ्टा पाहावयास मिळाल्या. काही दानशूर लोकांचे यातुन दर्शन झाले, तर शेजारी एकाला कोरोना झाला म्हणून संपूर्ण घराला वाळीत टाकण्याचा प्रकारही झाला. पण या संकटात पण वार्ड क्र.११मध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. स्थानिक नगरसेविका रिध्दी भास्कर खुरसंगे, भास्कर खुरसंगे यांनी स्थानिक जनतेच्या मदतीला धावत जाणे सुरुच ठेवले. मग ते अन्नदान असो, उपचारासाठी मदत असो. खुरसंगे मागे हटले नाहीत. सतत लोकांसोबत राहिले.
त्याच वेळी शिवसेनेचे शाखाप्रमुख सुबोध मानेही कुठेच कमी पडताना दिसले नाहीत. त्यांचे अन्नछत्र गेल्या वर्षापासून सुरूच आहे.
त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा निर्माण होताच ऑक्सिजन कॉन्सट्रेटरही उपलब्ध करुन दिलेत.
नियत चांगली असेल तर निधी उभा राहतो आणि चांगल्य नियोजनाने ते कितीही मोठे संकट असले तरी मोठं कार्य उभं राहतं. त्यात पुन्हा मग जर माझा विभाग, माझी जबाबदारी या भावनेनं काम करणारी माणसं असली तर मग काम कधीच थांबत नसतं.
पाहा व्हिडीओ: