मुक्तपीठ टीम
साताऱ्यामधील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरी लगतचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. महसूल विभाग आणि वनविभागाने सकाळीपासूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून १ हजार ५०० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवप्रतापदिनी अफझलखानाच्या कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडलं!
- प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम आता हटविण्यात आलं आहे.
- अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण हटविण्यासाठी वाद सुरु होता.
- शिवप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती.
- परंतु, विषय गुंतागुंतीचा असल्याने सातारा जिल्हा प्रशासनानं आणि सरकारनं याबाबत तटस्थ भुमिका घेतली.
त्यातच काही न्यायालयीन प्रकरणंही होती. - सर्व अडथळे दूर झाल्यावर आता राज्य सरकारकडून या कबर परिसरातील अतिक्रमण पाडण्यात आलं आहे.
- हा विषय संवेदनशील असल्याने या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- विशेष म्हणजे आजच्या शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून ही कारवाई करण्यात आली आहे.
परिसरात कलम १४४ कलम लागू!
- पुर्वी काही चौरस मीटरमध्ये असलेली ही कबर आता काही एकरांत पसरली आहे.
- यावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी हा परिसर संपूर्ण परिसर २००६ पासून सील करण्यात आला होता.
- हा परिसर खुला करावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत होती.
- हा वाद न्यायालयातही गेला होता.
- अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार हे अनधिकृत बांधकाम कडेकोट बंदोबस्तात हटवण्यात आले.
- या परिसरात १४४ कलम जारी करण्यात आलेले आहे.
- परिसरातील हॉटेलमध्ये असलेले पर्यटकही हटवण्यात आलेले आहेत आणि ती हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत.
अफझल खानच्या अनुयायांकडून कबरीचे उदात्तीकरण
- अफझल खानच्या अनुयायांकडून थडग्याचे उदात्तीकरण करण्यात येत होते.
- त्यामुळे साताऱ्यातील शिवप्रेमींकडून सातत्यानं हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी होत होती.
- अनेकदा त्यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचा धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती.
- यामुळे कबर परिसरात झालेले अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशा मागणीने जोर धरला होता.
- आज अखेर कारवाई झाली आहे.
- अफजल खान कबर परिसरात बांधण्यात आलेल्या १९ अनधिकृत खोल्या पाडण्यात येत आहे.
- हे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले.
- कारवाईची विषेश बाब म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून इतिहास घडवला होता आणि नेमकी १० नोव्हेंबर २०२२ या आजच्या दिवशीच ही कारवाई केली गेली.