मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना यापुढे वार्षिक जीवित प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. केंद्र सरकारने या प्रमाणपत्रासाठी देशभरात अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ते निवृत्तीवेतनधारकाच्या जीवित प्रमाणपत्राची नोंद करू शकतील. म्हणजेच, जर पेन्शनर किंवा फॅमिली पेन्शनर बँक, ट्रेजरी, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही सरकारी केंद्राला भेट देऊन प्रमाणपत्र देत असतील तर ते स्वीकारले जाईल. यामुळे त्यांचे पेन्शन थांबणार नाही.
पेन्शन मिळवणे आता अधिक सोपे
- अंडर सेक्रेटरी राजेश कुमार यांनी याबद्दल सविस्तर सांगितले.
- केंद्रीय कर्मचारी जीवित प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेकडे जातात.
- दरवेळी बँकाच्या फेऱ्यांमुळे त्यांना खुप त्रास सहन करावा लागतो
- त्यामुळे सरकारने आणखी अनेक केंद्रे सुरू केली आहेत, जिथे जीवित प्रमाणपत्र दाखवता येतील.
- ज्या बँकेत पेन्शन येते, तेथे जीवित प्रमाणपत्र मॅनेजर किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्याला देता येऊ शकते.
- जर तुम्ही लाइफ सर्टिफिकेट फॉर्म भरून पाठवलेत, तर निवृत्ती वेतनधारकांना स्वतः बँकेत किंवा त्या कार्यालयात जावे लागणार नाही.
- जर संबंधित अधिकाऱ्याने त्या फॉर्मवर स्वाक्षरी केली तर ती स्वीकारली जाईल.
ऑनलाईन सुविधा
- निवृत्तीवेतनधारक जीवन प्रमाण पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
- https://youtu.be/nNMIkTYqTF8 प्रमाणपत्र सादर करण्याची पद्धत या लिंकवर दिलेली आहे.
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) घरीच लाईफ सर्टिफिकेट मिळवण्याची सेवा सुरू केली आहे.
- या कामात पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक मदत करत आहेत.
- या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Google Play store वरून Postinfo APP डाउनलोड करू शकता.
- https://youtu.be/cERWM_U7g54 हे अॅप कसे कार्य करेल ते या लिंकवर दिले आहे.
लिव्हिंग सर्टिफिकेट सादर करण्यासाठी, सरकार १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाही सहभागी करवत आहे, ज्या १०० मोठ्या शहरांमध्ये घरपोच सेवा देखील प्रदान करतील. पेन्शनरला डोअरस्टेप बँकिंग (DSB) मोबाईल अॅप, https://doorstepbanks.com/ आणि https://dsb.imfast.co.in/doorstep/login किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे सेवा मिळेल:- 18001213721, 18001037188.
१ ऑक्टोबर पासून प्रमाणपत्र जमा करा
- टपाल विभागाच्या आदेशानुसार, यावर्षी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जीवित प्रमाणपत्र १ ऑक्टोबर २०२१ पासून जमा करणे सुरू होईल.
- निवृत्तीवेतनधारक दोन महिने येथे आपले प्रमाणपत्र सादर करू शकतील.
- १ऑक्टोबरपासून, ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे पेन्शनधारक त्यांचे लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतात.
- त्यांना ते पोस्ट ऑफिसच्या जीवनप्रदान केंद्रात किंवा ऑनलाइन जमा करावे लागेल
काय आहे जीवनप्रदान केंद्र
- जीवनप्रदान केंद्र निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी सर्व टपाल कार्यालयांच्या मुख्यालयात उघडण्यात आली आहेत.
- त्यांच्या मदतीने निवृत्तीवेतनधारक त्यांचे लाईफ सर्टिफिकेट नोंदवत होते.
- यामुळे त्यांची पेन्शन येत राहते.
- ८० वर्षांपेक्षा कमी वयाचे पेन्शनर १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतील.