मुक्तपीठ टीम
अशोक लेलँड हे आपल्या देशाच्या लष्करातील सर्वात मोठे लॉजिस्टिक्स व्हेईकल सप्लायर आहे. अशोक लेलँडने लाइट बुलेटप्रूफ गाड्यांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेला दिली आहे. या गाड्या सैन्य दलाच्या जवानांना प्रतिकूल परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित ठेवतात आणि शत्रूंचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढवतात. त्याचवेळी स्वत:ला सुरक्षित ठेवत असतात. भारतीय हवाई दलाला प्रथमच अशा गाड्या देण्यात आल्या आहेत.
या लाइट बुलेटप्रूफ गाड्या लॉकहीड मार्टिनच्या कॉमन व्हेईकल नेक्स्ट जनरेशनचा अडॉप्टेड वर्जन आहे. या गाड्या स्फोटकांचा हल्ले रोखण्यासाठी तयार केल्या आहे, ज्यामुळे त्यामध्ये बसलेल्या जवानांसाठी त्या रक्षा कवचासारख्या आहेत.
लाइट बुलेट प्रूफ गाड्यांचे फिचर्स:
• उच्च प्रतीची टेरिन सिस्टम आहे, जी त्यांना कोणत्याही प्रकारच्या मार्गांवर सहजपणे चालण्यास मदत करते.
• डोंगर रस्ते, चिखलाने भरलेले रस्ते, किंवा रेतीचे रस्ते असो, या गाड्या वेगाने जाऊ शकतात.
• कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता या गाड्या जवानांना पुढे नेतात.
• जवानांना सुरक्षित ठेवत शत्रूंविरूद्ध लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.
• या गाडीचे वजन देखील अगदी कमी आहे.
• त्यामुळे वेग सहज पकडता येतो.
• वाईट परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी आणि बचावासाठी, गाडीचे वजन कमी असणे आवश्यक आहे.