मुक्तपीठ टीम
रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी जिंकणारा मराठमोळा शिव ठाकरे आज सगळीकडे चर्चेत आहे. सध्या तो हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये खेळताना दिसत आहे. शिवने बिग बॉससह रोडीज या शोमध्येही भाग घेतला होता. सोशल मीडियावर त्याचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. प्रेक्षकांना शिवचा बिग बॉसमधील अंदाज खूप आवडताना दिसत आहे. शिव आज जे काही आहे ते स्वबळावर आहे. त्याने यासाठी असंख्य मेहनत, खडतर प्रवास केला आहे. शिवने कठोर परिश्रमानंतर आज हे यश मिळवले आहे.
मराठमोळ्या शिव ठाकरेचा खडतर प्रवास!
- शिव सुरुवातीच्या काळात आपल्या वडिलांना पानाच्या दुकानात मदत करत असे.
- पैसे कमवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला चांगले जीवन देण्यासाठी त्याने पेपर आणि दुधाची पाकिटेही विकली.
- रोडीज ऑडिशनमध्ये शिवने उघड केले होते की, तो कोरिओग्राफीही करायाचा.
- त्याने बहिणीसोबत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये फ्रीलान्स कामही केले. . त्याचा डान्स क्लास सुरळीत चालू होता आणि त्याला २०-२२ हजार रुपये मिळत होते.
- तो काही दिवस झोपडपट्टीमध्येही राहायचा.
रोडीज ऑडिशन दरम्यान शिवने त्याच्या संघर्षमयी प्रवासाबद्दल मोकळेपणाने सांगितले. तो म्हणाला की, कुटुंब सांभाळण्यासोबतच मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसेही वाचवत होतो. रोडीज नंतर, शिवने बिग बॉस मराठी २ मध्ये भाग घेतला आणि या प्रवासानंतर त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्याच्या स्मार्ट गेम प्लॅनने तो ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला. शिवने नुकताच स्वतःचा परफ्यूम ब्रँडही लाँच केला आहे.