मुक्तपीठ टीम
द्रोपदी मुर्मू या आपल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. त्याचबरोबर त्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या आहेत.
महामहिम द्रोपदी मुर्मू आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या राष्ट्रपती झाल्या आहेत, मात्र त्यांचा जीवनातील एक टप्पा पती, मुले यांना गमावण्याचा आहे. या शून्यातून राष्ट्रपती पदाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे.
द्रौपदी मुर्मूचा जीवन संघर्ष
- ओडिशातील अत्यंत मागासलेल्या आणि संथाल समुदायातील ६४ वर्षीय द्रौपदी यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे.
- द्रौपदी मुर्मूचा यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला होता.
- मुर्मू यांना दोन मुलगे आणि एक मुलगी झाली.
- पण त्यांच्या दोन मुलांचा आणि पतीचा मृत्यू झाला.
- मुले आणि पती गमावणे हा द्रौपदी मुर्मूसाठी कठीण काळ होता, परंतु त्यांनी हार मानली नाही आणि समाजासाठी काहीतरी करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला.
राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू या शिक्षिका
- एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील एका मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील आदिवासी कुटुंबात झाला.
- त्यांनी रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.
- राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू या शिक्षिका होत्या.
- यानंतर द्रौपदी मुर्म यांनी ओडिशाच्या राज्य सचिवालयातून नोकरीला सुरुवात केली.
द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकीर्द
- १९९७ मध्ये पहिल्यांदा नगर पंचायतीची निवडणूक जिंकून त्या प्रथमच नगरसेविका झाल्या.
- ३ वर्षांनंतर त्या रायरंगपूरच्या त्याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या.
- २००० मध्ये त्यांना पहिल्यांदा आमदार आणि नंतर भाजपा-बिजू जनता दल सरकारमध्ये दोनदा मंत्री बनण्याची संधी मिळाली.
- २०१५ मध्ये त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या.
राज्यपाल बनलेल्या पहिल्या ओडिया नेत्या
- द्रौपदी मुर्मू या ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपाच्या आमदार राहिल्या आहेत.
- ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २०० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.
- त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदाराचा “नीलकंठ पुरस्कार” प्रदान केला होता.
- २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या ओडिया नेत्या आहेत.
- २००२-०९ पर्यंत त्या ७ वर्षे मयूरभंजच्या भाजपा जिल्हाध्यक्ष होत्या.
- २०१३ मध्ये मयूरभंज जिल्हाध्यक्षपदी पदोन्नती झाली आणि राज्यपालांच्या खुर्चीचा पदभार स्वीकारेपर्यंत त्या पदावर होत्या.
- त्या काळात त्यांना भाजपा एसटी मोर्चा किंवा पक्षाच्या अनुसूचित जमाती शाखेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य बनवण्यात आले.