Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

देश हाच ध्यास, देश हाच श्वास…अंतिम क्षणापर्यंत! सलाम सीडीएस बिपिन रावत!!

सीडीएस बिपिन रावत यांचं अवघं जीवन लष्करी! वडिलही लष्करी अधिकारी...वाढले तेही लष्करी संगतीतच!

December 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bipin rawat (2)

मुक्तपीठ टीम

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना भारतीय सेनादलांचे पहिले प्रमुख म्हणजेच Chief of Defence Staff CDS पदाचा सन्मान मिळाला. त्यांची त्या नव्याने निर्मित सर्वात महत्वाच्या पदावर निवड झाली ती त्यांच्या कर्तृत्वामुळेच! त्यांनी गाठलेली ही उंची सहजच मिळवलेली नाही. २०१६मध्ये लष्करप्रमुख झालेले जनरल रावत ३१ डिसेंबर रोजी या पदावरून निवृत्त झाले आणि त्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. ते तिन्ही लष्करप्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष होते. सैन्यात विविध पदांवर काम करताना त्यांना युद्धाचा आणि सामान्य परिस्थितीचा पुरेसा अनुभव होता.

bipin rawat (4)

सीडीएस बिपिन रावत यांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे

बिपिन रावत यांचे बालपणही लष्करी वातावरणातच..

  • १६ मार्च १९५८ रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे जन्मलेल्या जनरल रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह रावत हे देखील लष्करात होते.
  • ते लेफ्टनंट जनरल पदासह निवृत्त झाले.
  • त्यांचे बालपण सैनिकांमध्ये गेले आणि त्यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट एडवर्ड स्कूल, शिमला येथे झाले.

bipin rawat (5)

शिक्षणही मिलिटरी अकॅडमीत…

  • शालेय शिक्षणानंतर बिपिन रावत हे इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे गेले.
  • त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले.
  • येथील त्यांची कामगिरी पाहून त्यांना पहिले सन्मानपत्र मिळाले ज्याला SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आले.
  • त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले, जिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
  • यासोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

bipin rawat (6)

अमेरिकेतील उच्च शिक्षणानंतर भारतात लष्करी सेवेस सुरुवात…

  • त्यानंतर रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्याच्या सेवेस सुरुवात केली.
  • १६ डिसेंबर १९७८ रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांना गोरखा ११ रायफल्सच्या ५व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आले. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला.
  • येथे त्यांना लष्कराचे अनेक नियम आणि टीमवर्क समजून घेण्याची संधी मिळाली.
  • गोरखा येथे राहत असताना त्यांनी अनेक सैन्य दलात क्रॉप्स, जीओसी-सी, साउथर्न कमांड, आयएमए डेहराडून, मिलटरी ऑपरेशन्स डायरेक्टरेटमध्ये लॉजिस्टिक स्टाफ ऑफिसर म्हणून काम केले आहे.

bipin rawat (7)

बिपिन रावत यांची लष्करप्रमुखपदी निवड…

  • जनरल बिपिन रावत यांचे कुटुंब भारतीय लष्करात अनेक पिढ्यांपासून सेवा करत आहे.
  • त्यांचे वडील, निवृत्त लेफ्टनंट जनरल लक्ष्मण सिंग रावत, १९६८ मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
  • उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे जन्मलेले रावत १६ डिसेंबर १९७८ रोजी गोरखा रायफल्सच्या ५ व्या बटालियनमध्ये सामील झाले.
  • जनरल बिपिन रावत सप्टेंबर २०१६मध्ये भारतीय लष्कराचे प्रमुख बनले.
  • रावत यांनी ३१ डिसेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली.
  • ते २०१९ पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते.

bipin rawat (8)

देशाचे पहिले सीडीएस…चीफ ऑफ डिफेंस स्टाफ!

  • रावत यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी भारतीय लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला.
  • त्यानंतर त्यांची देशात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या चीफ ऑफ डिफेंस स्टाफ म्हणजेच सीडीएस म्हणून निवड झाली.
    सीडीएस बनलेले ते देशातील पहिले अधिकारी आहेत.
  • सीडीएस म्हणजे तो अधिकारी असतो जो लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यात समन्वयक म्हणून काम करतो आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचा मुख्य सल्लागार असतो.

जनरल बिपीन रावत हे लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यावर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांची जागा घेतली.

bipin rawat (3)

सीडीएस बिपिन रावत यांचं युद्धभूमीवरील कर्तृत्व!

  • लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांनी उंच शिखरांच्या लढाईत प्रभुत्व मिळवले.
  • तसेच, त्यांनी दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या.
  • बिपिन रावत हे काउंटर इनसर्जन्सीमध्ये तज्ज्ञ मानले जातात. त्यांना या क्षेत्रातील मोठा अनुभव होत्या.
  • ईशान्येत त्यांनी चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पायदळ बटालियनचे नेतृत्व केले.
  • ते काश्मीर खोऱ्यातील राष्ट्रीय रायफल्स आणि इन्फंट्री डिव्हिजनचे कमांडिंग ऑफिसर होते.
  • २००८ मध्ये, ते काँगोमध्ये यूएन पीसकीपिंग ऑपरेशनमध्ये भारतीय ब्रिगेडचे प्रमुख होते. तिथे त्यांच्या नेतृत्वाचे खूप कौतुक झाले.
  • ३७ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत, बिपिन रावत यांना शौर्यासाठी अनेक सेवा पदके आणि पुरस्कार मिळाले.
  • युनायटेड नेशन्समध्ये काम करत असताना त्यांना दोनदा फोर्स कमांडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • बिपिन रावत यांचं संशोधन आणि लिखाणही!
  • बिपिन रावत हे सुरक्षेबाबतही लिहित असत.
  • त्यांचे लेख देशातील वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
  • त्यांनी मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजी स्टडीजमध्येही संशोधन पूर्ण केले आहे.
  • २०११ मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली.

bipin rawat (1)

बिपिन रावत यांची वेगळी विचारप्रक्रिया…

  • जनरल रावत यांची विचार करण्याची शैली वेगळी आहे, त्यांना देशाची सुरक्षा व्यवस्था आणि विशेषत: लष्करापुढील आव्हाने समजत असत.
  • साधनसामग्रीच्या कमतरतेतही सैनिकांना आपली जबाबदारी पार पाडणे किती कठीण असते, हेही त्यांना माहीत होते.
  • ते गोष्टींकडे एकांगी दृष्टीकोनातून पाहत नसत.
  • ते लष्कर आणि सामान्य लोक यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याच्या बाजूने असत.

 

Gp Capt Varun Singh SC, Directing Staff at DSSC with injuries is currently under treatment at Military Hospital, Wellington.

— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021

बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका…

  • नवे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रातून पदवीधर होत्या.
  • मधुलिका या सामाजिक कार्यकर्त्या होत्या, विशेषत: कर्करोगाच्या रुग्णांसाठी काम करत असत.
  • बिपिन रावत यांनी आपल्या आयुष्यातील ४२ वर्षे देशासाठी समर्पित केली.
  • आता त्यांच्याकडे आणखीही अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि आता ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक आहेत.
  • बिपिन रावत नेहमी सांगत की, “त्यांनी एकट्याने काहीही केले नाही, जे काही केले ते त्यांच्या टीममुळे.
  • तसेच त्यांचे आणखी एक वक्तव्य खूप गाजलेले.
  • सीडीएस बिपिन रावत यांनी जाहीर कार्यक्रमात जवानांना शिकवली जाणारी पाच तत्व सांगितलेली…
    “नाम, नमक, निशाण, वफादारी आणि इज्जत”
    म्हणजेच
    “नाव, मीठ, झेंडा, निष्ठा आणि सन्मान!”

ते म्हणालेले, “ही पाच तत्व जोपर्यंत अंमलात असतील, तोपर्यंत कुणाचीही वाकडी नजर टाकण्याची हिंमतच होणार नाही!

ते स्वत:ही अखेरच्या श्वासापर्यंत त्या तत्वांनीच जगले!


Tags: CDS Bipin RawatChief of Defense Staffचीफ ऑफ डिफेन्स स्टाफसीडीएस बिपिन रावत
Previous Post

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा, कुठे झाला? जाणून घ्या…

Next Post

आजही राज्यात ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण नाही! कोरोनाचे ८९३ नवे रुग्ण, १, ०४० बरे होऊन घरी!!

Next Post
corona

आजही राज्यात ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण नाही! कोरोनाचे ८९३ नवे रुग्ण, १, ०४० बरे होऊन घरी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!