मुक्तपीठ टीम
प्रत्येक नोकरी करणारा व्यक्ती हा नेहमी त्याच्या सेवानिवृत्तीबद्दल चिंतित असतो. परंतु आता चिंतेची कोणतीच बाब नाही. कारण, एलआयसीची जीवन शांती पॉलिसी योजना तुमची समस्या सोडवणार आहे. ३० वर्षांवरील वयोगटातील लोक त्यात गुंतवणूक करू शकतात.
एलआयसीच्या जीवन शांती पॉलिसीचे फायदे
- एलआयसीच्या या योजनेत मृत्यू लाभ उपलब्ध आहे. ज्यामुळे गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब आणि नामनिर्देशित व्यक्तीला इतर फायद्यांसह पेन्शन दिले जाते.
- या प्लॅनमध्ये तुम्हाला २ पर्याय मिळतील, पहिला इमिडिएट अॅन्युइटी आणि दुसरा डिफर्ड एन्युइटी.
- इमिडिएट अॅन्युइटीमध्ये गुंतवणूकदाराला लगेच पेमेंट मिळते. डिफर्ड अॅन्युइटीमध्ये, तुम्ही एकच प्रीमियम भरून योजनेत गुंतवणूक करता आणि ठराविक वर्षांनी तुम्हाला पेआउट मिळू शकतो.
- एलआयसीट्या या योजनेत किमान १.५ लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे. त्यात गुंतवणूक करण्याची जास्त मर्यादा नाही.
- १ ते २० वर्षांतील कोणतीही व्यक्ती पेन्शन सुरू करू शकता.
- कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला संयुक्त जीवन पर्यायामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
- जर तुम्ही १० लाखांच्या गुंतवणूकीवर ५ वर्षांनंतर पेन्शन सुरू केले तर त्याला ९.१८ टक्के परताव्याच्या दराने वार्षिक पेन्शन मिळते.
पेन्शनची रक्कम कितीपर्यंत मिळणार?
एलआयसीच्या या विमा पॉलिसीमध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी १० लाख रुपये गुंतवले तर, तुम्हाला वार्षिक ७४,३०० रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला ही रक्कम मासिक घ्यायची असेल तर ती सुमारे ९ हजार रुपये होईल. जर तुम्ही ५, १०, १५ किंवा २० वर्षांनंतर पेन्शन सुरू केले तर, काही अटी असल्या तरी त्यांची रक्कम वाढेल.
पॉलिसी ऑनलाइन आणि ऑफलाइन ही खरेदी करता येणार
ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते. एलआयसीची जीवन शांती ही एक व्यापक वार्षिकी योजना आहे ज्यामध्ये व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबालाही लाभ मिळतील.