मुक्तपीठ टीम
एलजीने जगातील पहिल्या रोलेबल टीव्हीची विक्री सुरू केली आहे. त्याला सिग्नेचर टीव्ही देखील म्हणतात. टीव्हीमध्ये ६५-इंचाची रोलेबल स्क्रीन आहे. ती चालू केल्यावर टीव्हीची स्क्रीन एका डॉकमधून बाहेर पडते आणि नंतर पुन्हा त्या डॉकमध्ये जाते. या टीव्हीला कंपनीने पहिल्यांदा ३ वर्षांपूर्वी लॉन्च केले होते.
या टीव्हीला कंपनीने पहिल्यांदा दक्षिण कोरियाच्या बाजारात लॉन्च केले होते. याची किंमत ८८,५०० डॉलर आहे म्हणजेच सुमारे ६४ लाख रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, जगभरात हे टीव्ही एलजीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतात. सुरुवातीला हे टीव्ही अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससह आणखी १५ देशांमध्ये विकले जातील. रेव्हेन्यूच्या बाबतीत एलजी ही जगातील दुसर्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीचा बाजारातील हिस्सा १६.५% आहे. त्याच वेळी, ३१.९% मार्केट शेअरसह सॅमसंग प्रथम क्रमांकावर आहे.
एलजी रोलएबल टीव्हीचे फीचर्स
१. हा रोलिंग टीव्ही तीन वेगवेगळ्या मोडमध्ये वापरला जाऊ शकतो, ज्यामध्ये तीन प्रकारचे डिस्प्ले साइज उपलब्ध आहेत. कंपनीने डिझाइन करण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
२. वापरकर्त्याने कमांड दिल्यानंतरच हा टीव्ही दिसून येईल, नाहीतर, टीव्ही त्याच्या तळाशी असलेल्या बेसमध्ये जाईल. त्याच्या तीन मोडपैकी एक लाइन व्ह्यू मोड आहे ज्यामध्ये या टीव्हीचा केवळ एक चतुर्थांश भाग वरच्या बाजूस दिसतो. वापरकर्ता याचा वापर क्लॉक, फोटो फ्रेम, मूड, म्यूझीक आणि होम डॅशबोर्ड म्हणून करू शकतो.
३. क्लॉक मोडमध्ये हे घड्याळासारखे कार्य करेल, फ्रेम मोडमध्ये वापरकर्ता आपला कौटुंबिक फोटो त्यात ठेवू शकतो, जो स्मार्टफोनच्या मदतीने यात दिसू शकतो आणि त्याचा मूड मोड घरात अधिक आरामदायक वातावरण तयार करू शकतो. वापरकर्त्याला ऑनस्क्रीन म्यूझीक कंट्रोल मिळू शकते, तसेच घरी इतर स्मार्ट गॅझेट देखील नियंत्रित करता येतात.
४. झिरो मोडमध्ये, संपूर्ण ६५ इंचाचा टीव्ही बेसमध्ये जातो. तसेच, झिरो मोडमध्ये, वापरकर्त्याला म्यूझीक आणि ऑडिओचा आनंदही घेता येईल. यात १०० वॅटची डॉल्बी अॅटॉम ऑडिओ सिस्टम आहे.
५. फुल व्ह्यूमध्ये मोठ्या स्क्रीनचा आनंद घेता येतो, जे एआय पावर्ड इमेज आणि उत्तम साउंड क्वालिटी देते. टीव्हीमध्ये एलजीचा सेकंड जनरेशनचा अल्फा ९ इंटेलिजेंट प्रोसेसर बसविण्यात आला आहे.
६. अॅमेझॉन अलेक्सा फीचरच्या मदतीने व्हॉइसद्वारे हा कंट्रोल केला जाऊ शकतो, जे वापरकर्त्याच्या सूचनांनुसार कार्य करेल.
७. हा जगातील पहिला ओएलईडी टीव्ही आहे ज्याची स्क्रीन बोलण्याने कार्य करते. यामध्ये पिक्सेल डिमिंग तंत्रज्ञानाचा वापर ऑप्टिमाइझ करण्यासाठी केला गेला आहे, जो सुमारे ३ कोटी सेल्फ-इमिटिंग पिक्सेलला सपोर्ट करतो.
पाहा व्हिडीओ: