मुक्तपीठ टीम
एअरटेल ५जी लाँच करण्याबाबत, एअरटेल इंडियाचे सीईओ गोपाल विट्टल यांनी युजर्सना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, एअरटेल ५जीची, स्पीड ४जी पेक्षा २० ते ३० पट जास्त असेल. याशिवाय कॉलिंग सुविधादेखील पूर्वीपेक्षा चांगले होईल. गोपाल विट्टल यांनी ५जी इंटरनेट संबंधित काही महत्त्वाची माहितीही दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेल ५जी सेवा महिनाभरात सुरू करणार आहे. डिसेंबरपर्यंत मोठ्या महानगरांमध्ये याचे कव्हरेज केले जाईल. त्यानंतर संपूर्ण देश व्यापण्यासाठी वेगाने विस्तार करण्यात येईळ. २०२३ च्या अखेरीस संपूर्ण शहरी भारत व्यापण्यात येणार आहे.
Airtel 5G सेवा कशी मिळणार?
- एअरटेल ५जी विशिष्ट गरजांसाठी भिन्न गुणवत्तेने सक्षम असेल, ज्याला नेटवर्क स्लाइसिंग असे म्हणतात.
- त्यामुळे जर कोणी गेमर असेल आणि चांगली स्पीड हवी असेल तर हे नेटवर्क सक्षम आहे.
Airtel 5G नेटवर्क का बेस्ट नेटवर्क आहे?
- एअरटेल ५जी नेटवर्क स्मार्टफोन लक्षात घेऊन डिझाइन केला आहे.
- एअरटेल ५जी भारतात कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करेल.
- तुम्ही प्रवास करत असाल किंवा एखाद्या ठिकाणी बसून असाल. तर कोणत्याही परिस्थितीत एअरटेल ५जी नेटवर्क मिळेल.
कोणता फोनमध्ये Airtel 5Gची सुविधा मिळणार?
- एक वर्षापेक्षा जुन्या स्मार्टफोन्सना क्वचितच ५जी चिपसेट मिळेल.
- आता भारतात लॉन्च होणारे बहुतेक नवीन स्मार्टफोन ५जी सपोर्ट असलेले आहेत. त्यामुळे तुम्ही एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करत असाल ज्यामध्ये ५जी सपोर्ट असेल की नाही, हे नक्की तपासा.
- त्यानंतर ५जी सेटिंग्ज चालू करा. ४जी किंवा एलटीईवर ५जी निवडण्याचा पर्याय मिळेल.