मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाची चौथी लाट येणार का? याची भीती वाढली असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. आगामी काळात कोरोनाचा संसर्ग फारसा वाढण्याची शक्यता नाही. संसर्ग दर स्थिर असल्याने आणि कोरोनाचे कोणतेही नवीन चिंताजनक व्हेरिएंट समोर न आल्याने अशी आशा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची ३ हजाक ४५१ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
नव्याने संसर्ग झालेल्यांमध्ये फारच कमी गंभीर प्रकरणे
- नव्याने संसर्ग झालेल्यांमध्ये गंभीर प्रकरणे खूपच कमी आहेत.
- बहुतेक संक्रमित पाच-सात दिवसांत बरे होतात.
- रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
- काही राज्यांमध्ये ते किंचित जास्त असू शकते, परंतु जर आपण देशव्यापी आकडेवारी पाहिली तर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार ६३५ इतकी नोंदवली गेली आहे.
- यापैकी बहुतेकांवर घरीच उपचार सुरू आहेत.
गेल्या २४ तासांत केवळ पाच मृत्यू
- गेल्या २४ तासांत एकूण ४० मृत्यूची नोंद झाली आहे, परंतु त्यापैकी ३५ केरळमधील आहेत, तर गेल्या २४ तासांत केवळ पाच मृत्यूची नोंद दिल्लीतील दोन, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
- तर संसर्ग दर एक टक्क्यांपेक्षा कमी ०.९६ वर आहे.
- हे गेल्या एका महिन्यात फक्त एकदाच घडले जेव्हा संसर्गाचा दर एक टक्क्यांच्या वर पोहोचला.
- एवढेच नाही तर साप्ताहिक संसर्ग दरही एक टक्क्यांहून खाली ०.८३ टक्क्यांपर्यंत नोंदवला गेला आहे.